शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

83 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार बुडाले ! काय सांगता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला. जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी केवायसीपासून वंचित असल्याने शासन याला मुदतवाढ देते काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन हप्त्यांत सहा हजार रुपये जमा केले जातात. यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत आधारकार्डसह इतर कागदपत्रे जोडून केवायसी करणे अनिर्वाय केले होते. केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले.  जिल्ह्यात या योजनेचे एकूण २ लाख ६१ हजार १२९ लाभार्थी असून ३१ मेपर्यंत यापैकी केवळ १ लाख ७७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी केवायसी केले आहे. तर तब्बल ८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला. जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी केवायसीपासून वंचित असल्याने शासन याला मुदतवाढ देते काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

३१ मेपर्यंतची होती डेडलाइन पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली होती. या कालावधीत बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केले. मात्र काही शेतकऱ्यांना इंटरनेट व संकेतस्थळ बंद असल्याचा फटका बसला.

१ लाख ७७ हजार ८७७ मिळणार पेन्शनपंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांत ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते. जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार १२९ शेतकऱ्यांपैकी १ लाख ७७ हजार ८७७ शेतकऱ्यांनी केवायसी केले असून या शेतकऱ्यांना नियमित पेन्शन मिळणार आहे. 

८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी केवायसी नाही- जिल्ह्यातील ८३ हजार २५२ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या पेन्शनला मुकावे लागणार आहे. 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत एकही शेतकरी केवायसीपासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जास्तीत शेतकऱ्यांना केवायसी करता यावे, यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात आली. - महसूल अधिकारी

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजना