शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८१० गावांमध्ये दारुबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:27 IST

गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देतंटामुक्त मोहिमेला पाठबळ : २९१ गावांना दारुबंदीचा ध्यास

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा शंभर टक्के दारुबंदी होण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांच्या घेतलेल्या आढाव्यानुसार ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे दारुबंदी संदर्भात जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या व महिला मंडळी किती सजग आहेत याची प्रचिती येते. दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात.गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहिम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दारुबंदी न केल्यास तुम्हाला निवडणुकीत सहकार्य करणार नाही, अशा धमक्याही महिला मंडळी गावातील पुढाºयांना देतात. परिणामी आपली मते खराब होणार नाही याची काळजी घेत दोन-चार दारु विक्रेत्यांच्या विरोधात समिकरण तयार करुन गावात दारुबंदीसाठी ठराव घेण्याचा प्रयत्न करतात.जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लहानसहान ११०१ गावांपैकी ८१० गावांमध्ये दारुबंदी तंटामुक्त समिती व महिला मंडळींनी केल्याची बाब पुढे आली आहे. महाराष्ट्रशासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या शासन निर्णयात गावातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धंदे बंद पाडून त्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा आधार घेत तंटामुक्त समित्या व महिला मंडळींनी गावातील अवैध धंदे म्हणजे दारुला मुख्य समजून या दारुला आपल्या गावातून हद्दपार करण्याचा मानस बांधला.त्यामुळे जिल्ह्यातील ८१० गावांमध्ये दारुबंदी झाली आहे. दारु विकणाऱ्यांचे धंदे बंद करुन त्यांना गावात सुरु होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामावर प्राधान्य देण्यात आले आहे. बॉक्सआर्थिक बचत व कलह कमीदारूमुळे पैशांची नासाडी होत असून सोबतच गृह कलह वाढतात.यामुळे महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने ८१० गावातील दारूबंदी करण्यात आली. या गावातील दारू पिणाऱ्या व्यक्तींची पैशांची बचत झाली व दारूबंदी झाल्याने वादही कमी झाले.दारूबंदीमुळे गावातील वातावरण आता सुधारत आहे. मद्यप्राशन करून गावातील चौकाचौकांत धिंगाणा घालणाºयांनी मंदिराची वाट धरली आहे.२९१ गावांकडे लक्षजिल्हा दारूबंदी करण्यासाठी फक्त २९१ गावे उरली आहे. महिलांनी या गावांमध्ये कंबर कसून दारूबंदी करण्यास सुरूवात केल्यास जिल्ह्यात दारूबंदी करण्यास वेळ लागणार नाही. या गावांत दारूबंदी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन महिलांची मदत घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी