शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

दोन दिवसांत ८०० गाड्यांची विक्री

By admin | Updated: April 1, 2017 02:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस-थ्री वाहनांना १ एप्रिल २०१७ पासून नोंदणी करण्यास मनाई केली.

शोरूममधील स्टॉक संपला : वाहने घेण्यासाठी नागपूरकडे धाव गोंदिया : सर्वोच्च न्यायालयाने प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस-थ्री वाहनांना १ एप्रिल २०१७ पासून नोंदणी करण्यास मनाई केली. राष्ट्रीय रस्ते व महामार्ग परिवहन मंत्रालयाने वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांना तशी नोटीस बजावली. या नोटीसचा धसका घेत सर्व कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेला जुन्या वाहनांची तत्काळ विक्री करण्यासाठी मोठी सवलत जाहीर केली. परिणामी दोन दिवसात गोंदियातील तीन खरेदी केलेल्या ८०० मोटार सायकलींची विक्री झाली. त्यांच्या नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात एकच गर्दी झाली होती. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी १ एप्रिल २०१७ पासून बीएस-फोर या वायुप्रदुषणविषयक मानकाची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याहीे प्रकारची वाहने म्हणजेच दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा व्यापारी वाहनांची विक्री वाहन उत्पादक व विक्रेत्यांना करता येणार नाही. १ एप्रिल २०१७ पासून या वाहनांची नोंदणीच होणार नाही, असे ठरविल्याने वाहन विक्री करणाऱ्यांनी त्या अवधीत सवलतीच्या दरात वाहने विक्री केली. सवलत पाहून लोकांनीही मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केली. शुक्रवारी रात्रीपर्यंत या वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरुच होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती. (तालुका प्रतिनिधी) विक्रेत्यांकडून उद्देशाला बगल पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालयाने बीएस-थ्री या वाहनांना नोंदणी करण्यास बंदी घातली. परंतु या वाहनांचे उत्पादक व विक्रेत्यांनी चलाकी करुन त्या वाहनांना सवलतीच्या दरात विक्री करुन दोन दिवसात गोंदियासारख्या शहरात ८०० वाहनांची विक्री केली. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या वाहनांना बंदी घालण्यात आली. परंतु एकाच दिवसात नोंदणी झालेली ही वाहने रस्त्यावर तर धावणारच आहेत. परिवहन कार्यालयात एकच गर्दी वाहनधारकांनी खरेदी केलेली वाहने ३१ मार्चच्या आत नोंदणी करणेही गरजेचे होते. त्यामुळे दि.३० व ३१ ला परिवहन कार्यालयात एकच गर्दी झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रात्रीपर्यंत कार्यालय सुरू ठेवून नोंदणीसाठी शक्य ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वाहनधारकांशी कर्मचाऱ्यांची बाचाबाची होत असल्याचे चित्र दिसले. शुक्रवारी रात्रीही नोंदणीचे काम सुरू होते.