शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

८० टक्के बाबाटोलीवासीय निवाऱ्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:37 IST

एकीकडे डिजीटल इंडियाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. भारत देश जगाच्या इतर विकसित देशासोबत स्पर्धा करीत असल्याचे सांगितले जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घर मिळण्याचे स्वप्न दाखवित आहे.

ठळक मुद्देआम्हालाही घरकूल द्या हो साहेब : फकीर समाजाची आर्त हाक, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : एकीकडे डिजीटल इंडियाचा मोठा गाजावाजा केला जात आहे. भारत देश जगाच्या इतर विकसित देशासोबत स्पर्धा करीत असल्याचे सांगितले जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घर मिळण्याचे स्वप्न दाखवित आहे. मात्र आजही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सोयींपासून वंचित असलेले लाखो कुटुंब आहेत. त्याचेचे एक ज्वलंत उदाहरण सालेकसा येथील बाबाटोली येथे पहायला मिळते. येथील फकीर समाज मुलभूत गरजांपासून दूर असून ८० टक्के नागरिकांना राहण्यासाठी निवाराच नाही.जवळपास ३० वर्षांपूर्वी फकीर समाजाचे काही लोक आपल्या कुटुंबासह सालेकसा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर तिथेच डेरा टाकून राहू लागले. काही काळानंतर येथेच स्थायी झाल्याने त्यांना सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालच्या मागील परिसरातील मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात आली.येथील फकीर समाजाचे लोक पूर्वी आमगाव खुर्द ग्रामपंचायत (आता सालेकसा नगर पंचायत) चे नागरिक झाले.त्यांची नावे सुद्धा मतदार यादीमध्ये आली. सध्या स्थितीत येथील ८० ते ९० नागरिक मतदानाचा हक्क बजावितात. जवळपास ५० कुटुंब स्थायी व २० कुटुंब अस्थायी स्वरुपात येथे वास्तव्य करीत आहे. मात्र दुर्देवाची बाब म्हणजे मागील ३० वर्षांपासून फकीर समाजाला मुलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर ८० टक्के कुुटुंब आजही उघड्यावर राहत आहे. लोकमत प्रतिनिधीने बाबाटोली येथे भेट दिली असता त्यांच्या निवाऱ्याचे विदारक चित्र पाहून मन विचलित झाले. त्यांना घरकुल योजनेबद्दल विचारले असता टोलीमध्ये आत्तापर्यंत केवळ १०-१२ कुटुंबानाच घरकुलाचा लाभ मिळाला आहे. तर ४० स्थायी कुटुंबाना घरकुलाचा लाभच मिळाला नाही. २० अस्थायी कुटुंबांना निवाऱ्याची गरज असताना सुद्धा त्यांना घरकुलाचे निकष लागू होत नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परिणामी त्यांना उघड्यावरचे जीवन जगावे लागत आहे. टोलीतील नागरिकांकडून माहिती घेत असताना टोलीतील सगळे धावून आले, आम्हालाही घरकुल मिळवून द्या हो साहेब, आपले लई उपकार होतील. आम्ही मुला-बाळांसह उघड्यावर राहतो. पोटासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो, अशी आर्त हाक टोलीतील महिला व पुरूषांनी दिली. राजमा कुर्बान शाह नावाची एक गर्भवती महिला, काही दिवसातच बाळंतीन होणार असून ती आपल्या कुटुंबासोबत कापडी भिंत आणि छत लावलेल्या झोपडीत वास्तव्य करीत आहे. तर मुस्कान आरीफ शाह यांचे कच्चे घर पावसाळ्यात कोसळले. बहुतेक लोकांचे घर कापडी किंवा प्लास्टिक छताचे असल्याने उन्ह वारा पावसाचा मारा सहन करीत त्यांना जीवन जगावे लागत आहे.मिळेल ते काम फकीर समाजाचेबहुतेक लोक तांबा,पितळ आणि इतर स्वस्त धातुचे दागिणे विकण्याचे काम गावोगावी फिरुन करतात. बरेचदा यातून मिळणाऱ्या पैशातून दैनदिन गरजा सुध्दा भागविणे शक्य होत नाही. काही लोक फकीर बाबा बनून भीक्षा मागतात. येथील अपंग लोक रेल्वेत भीख मागण्याचे काम करतात. येथील महिला सुद्धा गावोगावी फिरुन छोट्या मोठ्या वस्तुंची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतातआमगाव खुर्द ग्रामपंचायत असताना मागील काही वर्षापूर्वी येथील कुटुंबाना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून अर्ज भरण्यात आले. त्यात १८ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते. जवळपास १० ते १२ लोकांचे घरकुल तयार करण्यात आले आहेत. इतर लोकांना लाभ देण्यासाठी पात्रतेच्या श्रेणीत आणण्यासाठी कारवाही करावी लागेल.- किशोर आचले, ग्रामविकास अधिकारी, सालेकसा.