शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के धान व्यापाऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:56 IST

केंद्र शासनाने यंदा धानाच्या हमीभावात वाढ केली. सर्वसाधारण धानाला १७५० तर अ श्रेणीच्या धानाला १७७० रुपये हमीभाव शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र प्रशासनाने धान खरेदी सुरू करण्याच्या ठिकाणांचे नियोजन योग्य केले नाही.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी धान खरेदी केंद्रच नाही : प्रती क्विंटल पाचशे रुपयांचा फटका, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : केंद्र शासनाने यंदा धानाच्या हमीभावात वाढ केली. सर्वसाधारण धानाला १७५० तर अ श्रेणीच्या धानाला १७७० रुपये हमीभाव शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र प्रशासनाने धान खरेदी सुरू करण्याच्या ठिकाणांचे नियोजन योग्य केले नाही. परिणामी तालुक्यातील ८० टक्के धानाची विक्री खासगी व्यापाऱ्यांना शेतकरी करीत असून यामुळे त्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये कमी भाव मिळत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील कोटजमूरा येथे दरवर्षी फेडरेशनच्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येते. या ठिकाणी धानाची साठवणूक करण्यासाठी मोठे गोदाम आहे.त्यामुळे धान संग्रहित करुन सुरक्षित ठेवण्याची सोय आहे. तरी सुध्दा येथील धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. परंतु ८० टक्यापेक्षा जास्त धान व्यापाऱ्यांना विक्री होत आहे.धान खरेदी केंद्र अद्याप सुरु न झाल्याने व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या खड्यावर जाऊन धानाची उचल करीत आहे. शेतकऱ्यांची गरज भागविण्यासाठी त्यांना रोख चुकारे सुध्दा देत आहे. अनेक शेतकऱ्यांना धान विक्री करुन आपल्या गरजा भागविण्यासाठी रोख रकमेची गरज असते. कर्जाची परतफेड करण्यासाठी सुध्दा रकमेची गरज असल्याने शेतकºयांना आपले धान त्वरीत विक्री करावे लागत आहे. याच संधीचा फायदा खासगी व्यापारी घेत आहे.कावराबांध सोनपुरी परिसरात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून या क्षेत्रात धानाशिवाय इतर कोणतेही पीक घेतले जात नाही. त्यामुळे या परिसरात धान खरेदी केंद्र उघडणे गरजेचे होते.मात्र या परिसरात धान खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाºयांना धानाची विक्री करावी लागत आहे.यंदा हलक्या प्रजातीची धान कापणी व मळणी दिवाळीपूर्वीच झाल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी आपले हलके धान खासगी व्यापाऱ्यांना विकले. तर सध्या स्थितीत खासगी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या खड्यावरुन वाहन लावून धानाची खरेदी करीत आहे. तर शेतकरी सुध्दा गरजेपोटी धानाची ३०० ते ५०० रुपये कमी दराने धानाची विक्री करीत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड