शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

स्वच्छ विद्यालयात पुरस्कारासाठी ८ शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 9:24 PM

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्मितीत अव्वल असलेल्या जिल्ह्यातील ८ शाळांची राज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापैकी सात शाळांना फाईव्ह तर एका शाळेला फोर स्टार मिळाला आहे. तर ३० शाळा सब कॅटेगिरीत आहेत.

ठळक मुद्दे३० शाळा सब कॅटेगिरीत : सात शाळांना फाईव्ह व एकाला फोर स्टार

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्मितीत अव्वल असलेल्या जिल्ह्यातील ८ शाळांची राज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापैकी सात शाळांना फाईव्ह तर एका शाळेला फोर स्टार मिळाला आहे. तर ३० शाळा सब कॅटेगिरीत आहेत.केंद्र सरकारचा स्वच्छ-सुंदर (स्मार्ट) शहरासोबतच स्वच्छ-सुंदर व मूलभूत सुविधांनी परिपूर्ण शाळेची निर्मिती करण्याचा उद्देश आहे. या परियोजनेंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी २६८ शाळांनी अर्ज करण्यात आले होते. यापैकी १५ शाळांची फाईव्ह स्टार व ७२ शाळांची फोर स्टार व १७६ शाळांची थ्री स्टारसाठी निवड करण्यात आली आहे.जि. प. शिक्षण विभागाकडून स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. आॅनलाईन पद्धतीने निवड व मुल्यांकन करण्यात आले. आॅनलाईन मूल्यांकनानंतर ७ शाळांना फाईव्ह स्टार, एक शाळेला फोर स्टार ग्रेड देण्यात आले. या सर्व शाळांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ३० शाळांना फाईव्ह स्टारची सब कॅटेगिरी देण्यात आली आहे. ५ क्षेत्रातील ३९ घटक तयार करण्यात आले होते. या शाळांचे मुल्यांकन करून मिळालेल्या गुणांमुळे श्रेणी तयार करण्यात आली. ९० ते १०० टक्के गुण घेणाऱ्या शाळांना फाईव्ह स्टारला सर्वोत्कृष्ट, ७५ ते ८९ टक्के गुण घेणारी शाळा फोर स्टार उत्कृष्ट, ५१ से ७४ टक्के घेणाºया शाळा थ्री स्टार उत्तम परंतु सुधार करण्याची गरज आहे.३५ ते ५० टक्के घेणाºया टू स्टार शाळांना साधारण सांगून सुधार करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. ३५ टक्यांपेक्षा कमी गुण घेणाºया शाळांना बरीच कसरत करावी लागेल.फाईव्ह स्टार शाळेसाठी पाच विषय आहेत. भरपूर पाणी, स्वच्छता, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वच्छतेसाठी हँडवॉश स्टेशन ज्यात नेहमी पाणी उपलब्ध असेल. लिक्वीड व साबण उपलब्ध असणे आवश्यक आहे. कचरा पेट्या, कचरा निर्मूलनाची व्यवस्था, वॉशच्या सुविधेची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कुटुंब व नागरिकांचा सहभाग यांचे मूल्यांकन करण्यात आले. या सर्व सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळांना सब कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.शहरी भागासाठी मेरिटोरियस व प्रोग्रेसिव्हराज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी शहरी भागातून प्राथमिक विभागातून गोंदिया शहरातील सिव्हील लाईन्स येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट व तिरोडा येथील मेरिटोरियस पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली आहे. मेरिटोरियसला फाईव्ह स्टार तर प्रोग्रेसिव्हला फोर स्टार मिळाले आहेत.ग्रामीण भागात रेहळी-जमाकुडो अव्वलग्रामीण क्षेत्रात प्राथमिक विभागातून देवरी तालुक्यातील ग्राम रेहळी येथील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विभागातून सालेकसा तालुक्यातील ग्राम जमाकुडो येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. प्राथमिक विभागातून सोनेगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेने द्वितीय, खैरलांजी येथील जिल्हा परिषद प्राथमक शाळेने तृतीय तसेच माध्यमिक विभागात म्हैसुली येथील सोनियाबाई डी.आश्रमशाळेने द्वितीय, सडक-अर्जुनी तालुक्यातील कनेरी येथील डॉ.आर.के.हाईस्कूलने तृतीय क्रमांक पटकाविला. या शाळांना फाईव्ह स्टार देण्यात आले आहे.