शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

७९ कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 23, 2015 02:03 IST

गेल्या १५ वर्षापासून हिवतापापासून जिल्हावासीयांचा बचाव करण्याचे काम फवारणी कामगार करीत आहेत. त्यांना स्थायी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१३ मध्ये धडकले.

गोंदिया : गेल्या १५ वर्षापासून हिवतापापासून जिल्हावासीयांचा बचाव करण्याचे काम फवारणी कामगार करीत आहेत. त्यांना स्थायी करण्याचे आदेश आॅक्टोबर २०१३ मध्ये धडकले. मात्र, अद्याप त्यासंदर्भात विभागाचे कार्यवाही केली नाही. परिणामी कर्मचारी अद्याप तोकड्या मानधनावरच काम करीत आहेत. तुटपुंज्या वेतनावर त्यांना जीवन जगावे लागत आहे. मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात साथीच्या आजारांनी मृत्यूला कवटाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच जणांचा हिवतापाने मृत्यू होतो. शासन यावर आळा घालण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे रोगांवर आळा घालण्यात विभागाला सातत्याने अपयश येत आहे.साथीच्या आजारांत कीटकजन्य आजारांवर आळा घालण्याकरिता फवारणी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. मग १५ वर्षापासून कार्यरत ७९ कर्मचारी घरोघरी जाऊन फवारणी करतात. त्यांना मानधन म्हणून १९१ आणि २३० रुपये मोबदला दिला जातो. गोंदिया तालुक्यात २३, आमगाव २७, अर्जुनी मोरगाव ४, देवरीत ८, गोरेगावात ६ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना स्थायी करण्याची मागणी जोर धरत आहे. मागणीवर सकारात्मक भूमिका घेत शासनाने २८ आॅक्टोबर २०१३ रोजी सर्व सफाई कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यात फवारणीच्या कामावर असलेले कामगार फक्त सातवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतले असल्याच्या कारणावरुन त्यांना अद्याप कायम करण्यात आले नाही. आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचविणाऱ्यांची कीव येथील जिल्हा हिवताप विभागाला अद्याप तरी आली नाही. यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांना विचारले असता फवारणी कामगार दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले नसल्याने कायम करण्यात अडचण येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षणाच्या अटीमुळे कामगारांना रोजंदारीवरच जीवन काढावे लागणार काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय सहावा वेतन आयोग, सेवानिवृत्ती आदी प्रश्न देखील प्रलंबित आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर याकडे ते हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे फवारणी कामगार अडचणीत आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)