शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील ७४ जणांना केले रुग्णालयात क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:54 IST

एका धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली-निजामुद्दीम येथे प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांना गोंदिया येथील आयुवेर्दीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

ठळक मुद्दे५९ जणांचे अहवाल अप्राप्त २५५ जण प्रशासनाच्या देखरेखेखाली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  एका धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली-निजामुद्दीम येथे प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांना गोंदिया येथील आयुवेर्दीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्यांना सुध्दा येथे ठेवण्यात आले असून सध्या अशा एकूण ७४ जणांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर ५९ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर हायअर्लट करण्यात आले असून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या कालावधीत दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवास करणारे काही प्रवाशी सुध्दा या नागरिकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अशा प्रवाशांचा शोध घेवून त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम जिल्हा आणि आरोग्य विभागातर्फे दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या कालावधीत प्रवास करणाºया एकूण ३७ प्रवाशांची ओळख पटली असून या सर्वांना कुडवा परिसरातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने या सर्वांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. तर गोंदिया येथील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले होते. या बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांना सुध्दा आयुवेर्दीक महाविद्यालयात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. यांचेही नुमने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचासुध्दा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नाही. जिल्हा आरोग्य विभागाला जिल्ह्यातील ५९ जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.२५५ जण देखरेखेखालीजिल्ह्यात विदेशातून प्रवास करुन आलेल्या एकूण प्रवाशांची संख्या २२२ होती. तर या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या ९३१ ऐवढी होती. मात्र यापैकी ७७ प्रवाशांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यामुळे आता विदेशातून आलेले प्रवाशी व त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण २५५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर प्रशासनाची नजर आहे.बाधीत युवकाच्या प्रकृतीत सुधारणाशहरातील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे २७ मार्चला स्पष्ट झाले. त्यानंतर युवकाला आरोग्य विभागाने येथील शासकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागील सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आत्तापर्यंत १७ जणांचे नमुने निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १८ जणांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १८ जणांचे रिर्पोट प्राप्त झाले असून १७ जणांचे नमुने निगेटिव्ह तर १ नमूना पॉझिटिव्ह आढळला.जिल्ह्यात कोरोना बाधीत नवीन रुग्णांची नोंद आत्तापर्यंत झालेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस