शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७४ शाळाबाह्य बालके आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:35 IST

जी मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली नाहीत किंवा जी बालके स्तलांतरित होतात, अशा बालकांचे सर्वेक्षण बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसात अंतिम सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्देअंतिम सर्वेक्षण : शाळाबाह्य मुक्त जिल्हा होण्यासाठी धडपड

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जी मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली नाहीत किंवा जी बालके स्तलांतरित होतात, अशा बालकांचे सर्वेक्षण बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसात अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. यात ७४ बालके शाळाबाह्य असल्याचे उघडकीस आले आहे.सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसात अंतीम सर्वेक्षणात बालरक्षकांनी घरोघरी भेटी दिल्यात. बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजार इत्यादी ठिकाणी फिरून तळागाळातील,झोपडपट्टी, खेडे, गाव, वाडी, पाडे, तांडे, वस्ती, शेतमळे, जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३४ बालके आढळली.तिरोडा तालुक्यात १५ बालके, आमगाव तालुक्यात ८ बालके, सडक-अर्जुनी ७ बालके, सालेकसा ६ बालके, अर्जुनी-मोरगाव व गोरेगाव या तालुक्यात प्रत्येकी दोन बालके आढळलीत. देवरी तालुक्यात एकही बालक शाळाबाह्य आढळला नाही. शासन निर्णय २० मे २०१५ अन्वये ६ ते १८ वर्ष वयोगटातील शाळेत न जाणारी व सतत ३० दिवसापेक्षा अधिक गैरहजर राहणाºया बालकांचे सर्वेक्षण करण्यात येते. दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो. सर्वेक्षणाची कार्यपध्दती योग्यरित्या करण्यासाठी तालुका व गावपातळीवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत.९ जानेवारी २०१७ अन्वये बालरक्षक ही संकल्पना पुढे आणली. जिह्यात समता लिंक पुणे व जिल्ह्याच्या लिंकमध्ये ४५८ बालरक्षकांची नोंदणी केली आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची दखल घेण्यात आली.२४ बालकांनी शाळाच पाहिली नाहीगोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या अंतीम सर्वेक्षणात उत्तम कामगीरी केली. पाच दिवस केलेल्या सर्वेक्षणात पकडलेल्या ७४ बालकांपैकी २४ बालके अशी आढळली की ते कधीच शाळेत गेले नव्हते. त्यात १७ मुले व ७ मुलींचा समावेश आहे. अशी आमगाव तालुक्यात २, गोंदिया १८ व सालेकसात चार बालके आढळली.३० दिवसापेक्षा अधिक गैरहजर ५० बालकेज्या निकषाच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३० दिवस ंिकंवा त्यापेक्षा अधिक दिवस गैरहजर असणाºया बालकांची संख्या ५० आहे. त्यात २५ मुले व २५ मुलींचा समावेश आहे. आमगाव ६, अर्जुनी-मोरगाव २, गोंदिया १६, गोेरेगाव २, सडक-अर्जुनी ७, सालेकसा २ व तिरोडा १५ अशा ५० बालकांचा समावेश आहे.सर्वेक्षणानंतर एकही विद्यार्थी शाळाबाह्य आढळला तर त्याची जबाबदारी शिक्षक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची राहील, असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे बालरक्षकांनी व इतर शिक्षकांनी उत्तम कामगीरी करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले.-रमेश अंबुलेशिक्षण सभापती जि.प. गोंदिया.

टॅग्स :Schoolशाळा