शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

७३८४ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

By कपिल केकत | Updated: May 17, 2023 23:47 IST

ग्रामपंचायत पोटनिवडणूक, नऊ गावांत गुरूवारी मतदान

कपिल केकत -गोंदिया: ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यात आला असून जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायत मधील रिक्त जागांसाठी गुरुवारी (दि.१८) मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये एकूण ७३८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील आठ पैकी फक्त चारच तालुक्यांत ही पोटनिवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायत मधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायत मधील २९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. मात्र निवडणूक कार्यक्रमांतर्गत १४ जागांसाठी फक्त एकच अर्ज आल्याने त्या अविरोध झाल्या. तर तीन जागांसाठी एकच अर्ज आला व एका जागेसाठी आलेला एकमात्र अर्ज अवैध ठरल्याने एकूण चार जागांसाठी निवडणूक टळली आहे. अशात आता नऊ ग्रामपंचायतमध्ये ११ जागांसाठी ही पोटनिवडणूक घेतली जात असून त्यासाठी गुरुवारी (दि.१८) मतदान घेतले जाणार आहे.

यात सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा-जमी येथे ४८६ तर कोदामेडी येथे ४९९ मतदार, गोंदिया तालुक्यातील ग्राम परसवाडा येथे ५४१ मतदार, कोचेवाही येथे ६४१ मतदार, खमारी येथे बुथ क्रमांक-१ येथे ७९३ तर बुथ क्रमांक -२ येथे ८६४ मतदार, सावरी येथे बुथ क्रमांक-१ येथे ८३२ तर बुथ क्रमांक- २ येथे ७४७ मतदार, कारंजा येथे ६०६ मतदार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम केशोरी येथे ६८७ मतदार तर देवरी तालुक्यातील ग्राम गोटाबोडी येथे ६८८ मतदार असे एकूण ७३८४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. गुरुवारी होत असलेली मतदान प्रक्रिया त्या-त्या गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार आहे.

खमारी व सावरीसाठीच दोन बुथ- जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत फक्त गोंदिया तालुक्यातील ग्राम खमारी व सावरीसाठीच दोन बुथ ठेवण्यात आले आहेत. यात ग्राम खमारी येथील बुथ क्रमांक-१ वर ३६५ परुष व ४२८ महिला असे एकूण ७९३ मतदार तसेच बुथ क्रमांक -२ वर ४१६ पुरुष व ४४८ महिला असे एकूण ८६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर ग्राम सावरी येथे बुथ क्रमांक -१ वर ४२२ पुरुष व ४१० महिला असे एकूण ८३२ मतदार तसेच बुथ क्रमांक-२ वर ३७१ पुरुष व ३७६ महिला असे एकूण ७४७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

शुक्रवारी मतमोजणी व निकाल- गुरुवारी घेण्यात येणाऱ्या या मतदान प्रक्रियेची मतमोजणी व निकाल शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. निवडणूक होत असलेल्या गावांची मतमोजणी न निकाल त्या-त्या तहसील कार्यालयांमध्ये होणार आहे. अशात आता सर्वांच्या नजरा मतदान व निकालाकडे लागल्या आहेत.

तालुका- ग्रामपंचायत- पुरुष- महिला - एकूणगोंदिया - परसवाडा- २८१-२६०-५४१             कोचेवाही- ३१६-३२५-६४१             खमारी- ७८१-८७६-१६५७             सावरी- ७९३-७८६-१५८३             कारंजा- २८६-३२०-६०६अर्जुनी-मोरगाव- ३४०-३४७-६८७सडक-अर्जुनी- कोकणा-जमी.- ००-००-४८६             कोदामेडी- ००-००-४९९देवरी- गोटाबोडी- ००-००-६८८

टॅग्स :Electionनिवडणूकgondiya-acगोंदिया