शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

७२ हजार लाभार्थी शेतकरी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तीन महिन्याच्या अंतराने दुसरा हप्ता जमा करण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना : दुसरा हप्ता केवळ ४४ हजार शेतकऱ्यांना

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने दोन हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा २०१९ च्या अर्थसंकल्पात केली होती.यासाठी जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र आत्तापर्यंत या योजनेचा पहिला हप्ता केवळ ७२ हजार तर दुसरा हप्ता केवळ ४४ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती आहे.केंद्र सरकारने देशातील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तीन महिन्याच्या अंतराने दुसरा हप्ता जमा करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने निवडणुकीच्या धामधुमीत या योजनेची घोषणा केली तसेच या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या युध्द पातळीवर तयार करण्यासाठी महसूल व कृषी विभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. या दोन्ही यंत्रांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करुन ती शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर अपलोड केली.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार खातेदार शेतकरी असून त्यापैकी या योजनेसाठी १ लाख ५६ हजार शेतकरी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा व्हायला पाहिजे होती. मात्र पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही आतापर्यंत केवळ ८४ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा केला असून ७२ हजार शेतकरी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसऱ्या हप्त्याची स्थिती यापेक्षा बिकट आहे. केवळ ४४ हजार १४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली असून १ लाख १२ हजार शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.विशेष म्हणजे या योजनेची घोषणा होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी या योजनेचा लाभ पात्र सर्व शेतकऱ्यांना देण्यात केंद्र सरकार व संबंधित यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे.या योजने अंतर्गत हप्ते जमा होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना सुध्दा या योजनेबाबत शंका निर्माण झाली आहे.स्थानिक यंत्रणेचे काम केवळ याद्यांपुरतेचप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करुन त्या शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करणे ऐवढेच काम केवळ कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेचे आहे.त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही शासन स्तरावरुन केली जाते.त्यामुळे किती शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले याची माहिती या विभागांना बँकाकडून घ्यावी लागते.त्यामुळे या यंत्रणांचे काम केवळ याद्या तयार करण्यापुरतेच आहे.लाभार्थी शेतकरी संभ्रमातप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत एकूण पात्र शेतकºयांपैकी हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही पैसे जमा झाले नसल्याने आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार की याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.याद्या तयार तरी विलंब काजिल्ह्यातील प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या १ लाख ५४ हजार शेतकºयांच्या नावांच्या याद्या तयार करुन त्या शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आल्या आहे.मात्र यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास विलंब का होते आहे.याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना