शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७०० प्रवाशांनी दोन तास रोखली वैनगंगा एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:32 IST

आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देगैरसोय होत असल्याची तक्रार : दुसऱ्या गाडीत जाण्याची केली सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आंध्र प्रदेशात जाणाऱ्या मजुरांची संख्या बरीच आहे. कोरबावरून बेंगळुरूकडे जाणाऱ्या वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गर्दी झाल्याने गोंदिया रेल्वेस्थानकावर तब्बल दोन तास ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली. हा प्रकार रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.रेल्वे प्रशासनाने ७०० रेल्वे प्रवाश्यांना पुढे जाण्यासाठी गोंदिया बल्लारशा गाडीत व्यवस्था केली. गाडी क्र. १२२५२ वैनगंगा एक्स्प्रेस कोरबावरून बेंगळुरूला जात असताना रविवारी (दि.१६) दुपारी ३ वाजता गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वे गाडीतील आरक्षीत डब्ब्यामध्ये २ ते तीन हजार मजूर बसले होते. त्या मजुरांना दंड आकारून त्यांना डब्ब्यात बसू दिले. परंतु गर्दी अधिक असल्यामुळे त्या गाडीतील आरक्षीत डब्यांमधील आरक्षण केलेल्या प्रवाश्यांना अडचण झाली. यावरुन गोंधळ उडाला. गोंदिया रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच प्रवाश्यांमध्ये हमरीतुमरी होऊ लागली. ज्यांचे तिकीट कन्फर्म झाले ते प्रवाशी दुसºया रेल्वे प्रवाश्यांना आपल्या सीटवर बसू देण्यास तयार नव्हते. त्यामुळे सीट जवळील खुल्या जागेत मजूर बसले. परंतु गर्दी एवढी झाली की आरक्षण केलेल्या लोकांना पाय ठेवायला जागा नव्हती. आरक्षीत डब्ब्यात बसलेल्या मजुरांकडून रेल्वे तिकीट निरीक्षकांनी दंड आकारला. त्यामुळे मजुरांना त्याच ठिकाणी राहता आले. परंतु ती गोष्ट आरक्षण केलेल्या लोकांना मान्य नव्हती.आरक्षण केलेले प्रवाशी व सामान्य प्रवाशी यात धावत्या गाडीत शाब्दीक चकमक झाली. अखेर गोंदिया स्थानकावर दुपारी ३ वाजता पोहचलेली वैनगंगा एक्सप्रेस तब्बल दोन तास रोखून धरली. गोंदिया रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने ७०० मजुरांना खाली उतरविण्यात आले. त्या मजुरांना गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीने जाण्याची सोय रेल्वे विभागाने करुन दिली.वैनगंगा एक्सप्रेसला सामान्य बोगी एकच असल्यामुळे ही तारांबळ उडाल्याचे रेल्वे प्रवाश्यांचे म्हणणे आहे. परंतु मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्यांची तारांबळ उडाल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव, रायपूर येथील हजारो मजूर त्या गाडीतून प्रवास करीत होते. सायंकाळी ५ वाजता दरम्यान वैनगंगा एक्सप्रेसने पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्याची माहिती रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार चक्रे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी