शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

68 हजार मुलांचे होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

देशात १८ वर्षांपुढे लसीकरणाला सुरूवात झाली असून, त्याखालील मुलांचे लसीकरण अदयाप सुरू झालेले नाही. मात्र, आता ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र शासनाने राज्यात ३ जानेवारी २०२२पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना कोविड-१९ लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात ६८,३२१ मुले व मुलींना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात वाढत असलेले कोविड रुग्ण व आढळून येत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड-१९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑफ ईम्युनायजेशन तसेच स्टॅंडिंग टेक्निकल सायंटिफिक कमिटी यांनी कोविड-१९ लसीकरण वाढविण्यासाठी केंद्राला राज्यांमध्ये १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले व मुलींना कोविड लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार १५ ते १८ वयोगटात जिल्ह्यातील ६८,३२१ मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, त्यांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूने सध्या जगभरात दहशत माजवली आहे. भारतातही आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून, झपाट्याने रूग्ण वाढत आहे. देशात १८ वर्षांपुढे लसीकरणाला सुरूवात झाली असून, त्याखालील मुलांचे लसीकरण अदयाप सुरू झालेले नाही. मात्र, आता ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र शासनाने राज्यात ३ जानेवारी २०२२पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना कोविड-१९ लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात ६८,३२१ मुले व मुलींना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

लाभार्थ्यांची तालुकानिहाय आकडेवारी * कोविड लसीकरणासाठी तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया ग्रामीणमध्ये १४,९२६ व गोंदिया शहरमध्ये ६,६५६,  आमगाव तालुक्यात ६,९६१, तिरोडा तालुक्यात ८,९३४, गोरेगाव तालुक्यात ६,३५१, सालेकसा तालुक्यात ४,७८८, देवरी तालुक्यात ६,०८५, सडक-अर्जुनी तालुक्यात ५,९९६ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७,६२६ लाभार्थी आहेत.

 लसीकरणासाठी असे आहेत निकष * लसीकरणासाठी सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी पात्र राहतील.* लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येईल.* लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा १ जानेवारी २०२२पासून सुरू होईल.* लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे.* १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र निश्चित करावे लागेल. ज्याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे शक्य नसेल, अशाठिकाणी स्वतंत्र रांगा असाव्यात.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या