शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

११ महिन्यांत पळविल्या ६८ मोटारसायकल

By admin | Updated: December 7, 2014 22:52 IST

जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. चालू वर्षाच्या ११ महिन्यांत अज्ञात चोरट्यांनी ६८ मोटारसायकल पळवून नेल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यातील एकट्या

टोळी सक्रिय : एकाच महिन्यात १५ वाहने पळविलीगोंदिया : जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. चालू वर्षाच्या ११ महिन्यांत अज्ञात चोरट्यांनी ६८ मोटारसायकल पळवून नेल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यातील एकट्या नोव्हेंबर महिन्यात १५ मोटारसायकल पळविण्यात आल्या आहेत.गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांपैकी गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक मोटार सायकल पळविण्यात आल्या आहेत. गोंदिया शहरातील गर्दीच्या ठिकाणांना या चोरट्या टोळीतील सदस्यांनी टार्गेट केले आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, रेल्वे स्थानक, बाजार परिसर, जयस्तंभ चौक, बसस्थानक, शाळा, महाविद्यालय व शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या वाहनांना त्यांनी लक्ष्य केले आहे. एखाद्या नागरिकाने आपले वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून बाजार परिसरात गेले तर त्यांच्यावर नजर ठेवणारा एक व्यक्ती त्या वाहनाला चोरून नेणारा दुसरा व्यक्ती असे दोघे व्यक्ती त्या मोटारसायकलला पळवितात. हे वाहन पळविण्यासाठी आरोपी चहाटपरीचा आधार घेत असल्याची माहिती आहे. तासनतास चहाटपरीवर बसून त्या मोटारसायकलवर आपली नजर ठेवतात. विशेष म्हणजे खुल्या मोटारसायकल तर सोडाच मात्र लॉक करून ठेवलेल्या मोटारसायकलला देखील काही वेळातच पळवून नेत आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या सन २०१४ च्या ११ महिन्यांत ६८ मोटारसायकल पळविण्यात आल्या आहेत. सन २०१३ या वर्षात ४८ तर सन २०१२ मध्ये ७१ मोटारसायकल पळविण्यात आल्या होत्या. दुचाकीला पळविणाऱ्या टोळीच्या मागावर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आहे. मात्र पोलीस यंत्रणेला या चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही. (तालुका प्रतिनिधी)