शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केट ट्रेडिंग करतांना ६८ लाखाची फसवणूक

By नरेश रहिले | Updated: February 27, 2024 20:40 IST

एम.ब्लॅक रॉक नावाचा बनविला होता व्हॉट्सॲप ग्रूप: ग्रूपच्या पाच मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल

नरेश रहिले, गोंदिया: शेअर मार्केट ट्रेडींंग करण्याची जणू शर्यतच लागली आहे. जो-तो शेअर मार्केट ट्रेडींंग करून मोठे पैसे कमविण्याची लालसा करतो. शेअर मार्केट ट्रेडींंग करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रूप तयार करून ६८ लाखाची फसवणूक करणाऱ्या त्या ग्रूपच्या पाच मोबाईल धारकांवर गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गोंदियाच्या मरारटोली, बालाघाट रोड भगतसिंग वॉर्ड गोंदिया येथील मोहम्मद रझा मनैुद्दीन तिघाला (२९) यांना २० नोव्हेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ या दरम्यान शेअर मार्केटचे बनावटी ॲप तयार करून शेअरमार्केटमध्ये पैसे कसे गुंतवणूक करून पैसे कसे खेळायचे याची माहितीही ते व्हॉट्सॲप ग्रूपवर द्यायचे. त्यांच्या आमिषाला बळी पडून मोहम्मद रझा मनैुद्दीन तिघाला (२९) यांची तब्बल ६८ लाख १३ हजार २६७ रूपयाने फसवणूक केली आहे. मोहम्मद तिघाला १२ नोव्हेंबर २०२३ रोजी फेसबूक व इन्स्टाग्रामचा वापर करीत असतांना इन्स्टाग्रामवर त्यांना एक लिंक दिसली. शेअर मार्केट संदर्भात माहिती देणारी ती लिंक होती. त्या लिंकला उघडल्यावर एम ब्लॉक रॉक या व्हॉट्सॲप ग्रूपचा सदस्य बनविले. त्या ग्रूपमध्ये ८७ लोक होते. त्यापैकी ११ लोक ॲडमीन होते. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ॲडमीन पैकी एकाने त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर चॅटींग करून ट्रेडींग संदर्भात मािहती देऊन आपल्या मोबाईलने एक लिंक पाठविली होती. त्या लिंकला उघडल्यावर व्हीआयपी कॅन्सुलेशन या नावाच्या व्हॉटसॲप ग्रूपवर जोडण्यात आले. आरोपी सांगत गेले आणि मोहम्मद तिघाला प्रोसेस करीत गेले. आणि तब्बल ६८ लाखाने त्यांची फसवणूक करण्यात आली.१० ते २० टक्के रक्कम अधिक मिळण्याचे दिले आमिष

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर गुंतवलेल्या पैश्याचे १० ते २० टक्के रूपये तुम्हाला मिळतील असे आमिष देऊन मोहम्मद रझा मनैुद्दीन तिघाला (२९) यांची फसवणूक करण्यात आली.१२ ट्रान्जेक्शनमधून लुटले ६८ लाख

वेगवेगळ्या वेळी १२ ट्रान्जेक्शन करून मोहम्मद रझा मनैुद्दीन तिघाला (२९) यांनी आरोपींना ६८ लाख १३ हजार २६७ रूपये पाठविले. त्यातील ३८ लाख एक हजार १०१ रूपये बॅंक ऑफ इंडिया, ४ लाख रूपये तिघाला ट्रडर्सच्या ॲक्सीस बॅंकेतून तर २६ लाख ४९ हजार ९६६ रूपये आयसीआयसीआय बॅंकेच्या खात्यातून आरोपींना पाठविण्यात आली होती.

टॅग्स :fraudधोकेबाजी