शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

६३ हजार नागरिकांचे होणार ‘महासमाधान’

By admin | Updated: February 20, 2017 00:50 IST

विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागू नये ...

विविध योजनांसह दिव्यांगांना लाभ : उद्यापासून अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व गोरेगावमध्ये शिबिरगोंदिया : विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागू नये आणि पात्र लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी, कमीत कमी श्रमात योजनांचा लाभ मिळावा यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या तीन तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी ‘महासमाधान शिबिरा’चे आयोजन केले जात आहे. दि.२१ ते २३ फेब्रुवारी असे तीन दिवस तीनही तालुका मुख्यालयी होणाऱ्या या शिबिरातून ६३ हजार पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला जाणार आहे.जुलै २०१६ मध्ये महाराजस्व अभियान राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत अर्जुनी- मोरगाव, गोरेगाव, सडक अर्जुनी या तालुक्यात पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. याशिवाय दिव्यांग स्वावलंबन अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक ठरणारे साहित्य व साधने मोजमाप शिबिर म्हणून पूर्वतयारी समाधान शिबिर घेण्यात आले होते. त्यात ४८ हजार नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. त्यातून निवडलेल्या लाभार्थ्यांनाही या शिबिरात साहित्यांचे वाटप होणार आहे.संबंधित योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देता यावा यासाठी तिन्ही तालुक्यात महावितरण महासमाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरु वात अर्जुनी -मोरगाव येथून केली जात आहे. दि.२१ फेब्रुवारीला अर्जुनी-मोरगाव येथील तहसील कार्यालयात संबंधित गरजू व पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात येणार आहे. याचप्रमाणे दि.२२ रोजी सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात तर २३ रोजी गोरेगाव येथील पंचायत समितीच्या प्रांगणात हे महावितरण शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरात विविध योजनांसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांमध्ये अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील ४५०० लाभार्थ्यांना शिधापत्रिका, ५३३ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना., १२१२ लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजना, १८५ राष्ट्रीय कुटूंब, २६९ आम आदमी विमा, इंदिरा गांधी रा.वि.नि.वे.योजनेसाठी १२१ लाभार्थी, जमीन वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रु पांतर ३०२८, संपत्तीचे आपसी वाटणीपत्र ५८, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र १३ हजार ७६, जातीचे प्रमाणपत्र ७ हजार ७११, जमीन मोजणी ५६, जमीन सुपिकता प्रमाणपत्र ६ हजार ५८१, कृषीपंप विद्युत जोडणी २२८, वीज व्यवसायिक जोडणी २८, घरघुती वीज जोडणी ५२१, रमाई घरकूल ४०, इंदिरा आवास १८१, मुद्रा बँक कर्ज ४६, सुकन्या समृध्दी योजना १००, पीक विमा योजना ८ हजार ३४०, शेतकरी अपघात विमा योजना १६, आंतरजातिय विवाह प्रोत्साहन योजना १७, वन्यप्राण्यांनी केलेली नुकसानभरपाई १२७, महामंडळाद्वारे कर्ज पुरवठा १७७, वनहक्क जमीनीचे पट्टे वाटप ६५, विद्यार्थी सायकल वाटप २४१, शिलाई मशिन वाटप ६०, अपंगत्व ओळखपत्र २१३, आधारकार्ड, मतदान कार्ड, अधिवास प्रमाणपत्र ६ हजार ५००, डिझेल पंप वाटप ३०, उज्वला गॅस कनेक्शन वाटप ६ हजार ३२३, जननी सुरक्षा योजना २७९, मानव विकास कार्यक्र म ३००, माहेरघर योजना २३, वन विभाग गॅस पुरवठा २००, शेडनेट पॉलिहाऊस २५, बैलजोडी ५९, जनधन योजना १५६, पाईप वाटप ५० नग १३ लाभार्थी, शेतीपयोगी औजारे धान उडविणारे पंखे ५, बैलगाडी २८, पी. आर. कार्ड १००, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर १९, अपंगत्व प्रमाणपत्रे २०४, अपंग व्यक्तींना सहाय्यक साधने व उपकरणे वाटप ६२६, गटई कामगारांना स्टॉल वाटप ९, आदी साहित्यांचे वाटप पालकमंत्री ना. बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमीत्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि.२१ ला सायंकाळी ७.३० वाजता ‘वादळाची सावली’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजता सप्तखंजिरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्र म व गोरेगाव येथे २३ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या प्रांगणात सायंकाळी ७.३० वाजता ‘वादळाची सावली’ या नाटकाचा प्रयोग सादरीकरण करण्यात येणार आहे. या महासमाधान शिबिरासह आयोजित कार्यक्र मांचा लाभ नागरिकांनी व दिव्यांग बंधू- भगिनींनी घेण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)