शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

३६ पाल्यांचे ६.२५ लाख शिक्षण शुल्क झाले माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

कोरोनाने पालक हिरावून घेतले अशा पाल्यांना आधार देण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना, अधिकारी पुढे आले. यात ज्या शाळांनीही आपली सामाजिक बांधीलकी जपत आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे आई-वडील कोरोनाने मृत्यू पावले अशा विद्यार्थ्यांचे तीन वर्षांसाठी शैक्षणिक शुल्क माफ केले. जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांचे ६ लाख २५ हजार ३८० रुपये शैक्षणिक शुल्क २२ शाळांनी माफ केले आहे.

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाचे जगावर संकट आले. यातून गोंदिया कसा सुटणार? कोरोनाने पालक हिरावून घेतले अशा पाल्यांना आधार देण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना, अधिकारी पुढे आले. यात ज्या शाळांनीही आपली सामाजिक बांधीलकी जपत आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे आई-वडील कोरोनाने मृत्यू पावले अशा विद्यार्थ्यांचे तीन वर्षांसाठी शैक्षणिक शुल्क माफ केले. जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांचे ६ लाख २५ हजार ३८० रुपये शैक्षणिक शुल्क २२ शाळांनी माफ केले आहे.जिल्ह्यात कोविडने मृत्यू पावलेल्या पालकांची ३६ बालके खासगी शाळेत शिकत आहेत. या शाळांनी या निराधारांना आधार देण्यासाठी यंदापासून पुढील तीन वर्षांपर्यंतचे शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. फुलचूर येथील फुंडे सायन्स ॲण्ड आय.टी. ज्युनिअर कॉलेजने ७ हजार, आदर्श कॉन्व्हेंट ॲण्ड इंग्लिश हायस्कूल आरटीओ ऑफिसजवळ गोंदिया २२ हजार ४८० रुपये, भारतीय ज्ञानपीठ, बॅंक कॉलनी लोहिया वॉर्ड गोंदिया १६ हजार ३२५ रुपये, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल गोंदिया १४ हजार, ओर्किड इंटरनॅशनल पब्लिक स्कूल सूर्याटोला १४ हजार ४००, गुजराती नॅशनल स्कूल रेलटोली ४३ हजार ८०० रुपये, विमलताई सायन्स ज्युनियर कॉलेज कटंगी नाका २७० रुपये, श्रीमती जे. एम. व्ही. इंग्लिश प्रायमरी स्कूल रेलटोली गोंदिया ४१ हजार, श्रीमती जे. एम. वसंत इंग्लिश प्रायमरी स्कूल गोंदिया ३७ हजार, आदिवासी विकास हायर सेकंडरी स्कूल खजरी ५ हजार ५००, नवजीवन विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज जमनापूर ५ हजार, श्री कमलाकरराव केशवराव इंगळे ज्युनिअर काॅलेज गोंदिया ३० हजार, साकेत पब्लिक स्कूल गोंदिया ५७ हजार १०० रुपये, श्रीमती आनंदीदेवी गोपीलाल अग्रवाल महावीर मारवाडी इंग्लिश प्रायमरी स्कूल फुलचूर ७ हजार २०० रुपये,  विवेक मंदिर स्कूल गोंदिया १ लाख ५९ हजार ८०० रुपये,  चंचलबेन मनीभाई पटेल स्कूल गोंदिया ४९ हजार ९३० रुपये, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट सिव्हील लाईन गोंदिया १९ हजार ५००, ॲक्साविर हायस्कूल गोंदिया ३० हजार ७५ रुपये, शारदा कॉन्व्हेंट गोंदिया १९ हजार, सीता पब्लिक स्कूल सुरतोली ९ हजार, ख्रिस्तानंद पब्लिक स्कूल रेल्वे स्टेशन रोड रिसामा आमगाव ३७ हजार व संस्कार इंग्लिश प्रायमरी स्कूल गोंदिया १० हजार रुपये माफ केले आहेत.

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण