शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

६०२ शाळांत मिळणार दूध व अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:42 IST

गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त समजून शासनाने या तीन तालुक्यातील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध व अंडी मध्यान्ह भोजनात दिली जाणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्त तीन तालुक्यांचा समावेश: ६२ हजार विद्यार्थ्यांसाठी मिळाले ४ कोटी ८९ लाख

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त समजून शासनाने या तीन तालुक्यातील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध व अंडी मध्यान्ह भोजनात दिली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ६०२ शाळांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यात महाराष्ट्र शासनाने मध्यम दुष्काळ जाहीर केला होता. या दुष्काळग्रस्त भागातील वर्ग १ ते ८ च्या ६२ हजार ६९६ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ सत्र २०१८-१९ पासून मिळणार आहे. आठवड्यातून ३ दिवस दूध व अंडी देण्यासाठी दररोज ५ याप्रमाणे प्रति विद्यार्थी १५ प्रमाणे पैसे देण्यात आले. या विद्यार्थ्यांना ५२ आठवडे लाभ देण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ८९ लाख २ हजार रूपये शासनाने दिले आहे. गोंदिया तालुक्यातील २९३ शाळांमधील ३४ हजार ६११ विद्यार्थ्यांना अंडी व दूध देण्यासाठी २ कोटी ६९ लाख ९५ हजार ७०० रूपये देण्यात आले. तिरोडा तालुक्यातील १७२ शाळांमधील १६ हजार ७२१ विद्यार्थ्यांसाठी १ कोटी ३० लाख ४२ हजार ३८० रूपये, गोरेगाव तालुक्यातील १३७ शाळांतील ११ हजार ३६४ विद्यार्थ्यांसाठी ८८ लाख ६३ हजार ९२० रूपये असे एकूण ४ कोटी ८९ लाख २ हजार रूपये दिले आहेत.आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरीया दुष्काळग्रस्त भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून दूध,अंडी व इतर पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. त्या शाळांमध्ये लोकसहभाग, ग्रामनिधी किंवा जिल्हा निधीतून बायोमेट्रिक मशीन खरेदी करून त्या मशीनद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात येईल.प्रत्येक दिवशी वेगळा आहारआठवड्यातून तीन दिवस पौष्टिकआहार देण्याचे ठरविले. या तीन दिवसाचे ५ रूपयाप्रमाणे १५ रूपये तीन दिवसाचे एका विद्यार्थ्यासाठी मिळणार आहेत. परंतु तीन्ही दिवस वेगळा-वेगळा आहार असावा अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. देण्यत आलेली ही रक्कम फक्त पौष्टिक आहारावरच खर्च करावी अश्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Schoolशाळा