लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील जिल्हा कार्यकारणीत बद्दल करावयाचा असेल तर राज्य संघटनेला पत्रव्यवहार करुन आपली तक्र ार करावी लागते. पण परवानगी न घेता ६ गाव कामगार पोलीस पाटलांनी नवीन जिल्हा कार्यकारणीची घोषणा केल्याने चार पुरुष व दोन महिला पोलीस पाटलांना संघटनेतून १२ एप्रिलला निष्कासीत केल्याची माहीती राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी पंचायत समिती सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, श्रीराम झिंगरे, रमेश टेंभरे, राजेश बंसोड, कोमेश कटरे, लोकचंद भांडारकर, बनवाली मंडल, प्रकाश कठाणे, हेमराज सोनवाने, गजानन जांभुरकर, चंद्रहास भांडारकर उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यातील गाव कामगार पोलीस पाटील जिल्हा उपाध्यक्ष आनंद तुरकर काटी, जिल्हा सचिव मनोहर चव्हाण खमारी, महिला संघटना जिल्हा सचिव गायत्री पवार घाटी, संघटनमंत्री मोहन बघेल पानगाव, प्रविण कोचे मूर्री, नर्मदा चुटे आमगाव यांनी बंडखोरी करून जिल्हा संघटना तयार केली.संघटनेच्या नियमांना डावलून संघटना तयार केल्याने त्यांना जिल्हा संघटनेतुन १ वर्षाकरीता निष्काशीत करण्यात आल्याचे परशुरामकर यांनी सांगितले.जिल्हा उपाध्यक्षपदी रमेश टेंभरे, जिल्हा सचिव राजेश बंसोड, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे यांची निवड करण्यात आली. महिला आघाडी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेत जिल्हा अध्यक्ष नंदा ठाकरे, जिल्हा उपाध्यक्षपदी अनिता लंजे यांची निवड करण्यात आली.या संदर्भात जिल्हा संघटनेचा ठराव घेण्यात आल्याचीही माहिती यावेळे देण्यात आली.
६ पोलीस पाटील संघटनेतून निष्कासित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:19 IST
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील जिल्हा कार्यकारणीत बद्दल करावयाचा असेल तर राज्य संघटनेला पत्रव्यवहार करुन आपली तक्र ार करावी लागते. पण परवानगी न घेता ६ गाव कामगार पोलीस पाटलांनी नवीन जिल्हा कार्यकारणीची घोषणा केल्याने चार पुरुष व दोन महिला पोलीस पाटलांना......
६ पोलीस पाटील संघटनेतून निष्कासित
ठळक मुद्देभृंगराज परशुरामकर : पत्रपरिषदेत दिली माहिती