शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

12-14 गटात 59 टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

१८ वर्षे पुढे वयोगटाला परवानगी देण्यात आली व १५ वर्षे वयोगटाचेही नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे. एवढ्यातच तिसरी लाट आली व आता तिसरी लाट ओसरली असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे; मात्र कोरोनाला मात देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरूच असून, नवनवीन लसींना परवानगी दिली जात आहे. सध्या १५ वर्षे पुढे गटाचे लसीकरण सुरू असले तरी त्या खालील मुलांचे लसीकरण झालेले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे; मात्र चीन आणि साऊथ कोरिया या देशात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर देशात चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात १२-१४ वयोगटातील मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने १९ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरण सुरू झाले असून, आतापर्यंत २५,९९४ मुलांचे लसीकरण झाले असून, त्याची ५८.८६ एवढी टक्केवारी आहे. कोरोनाला मात देण्यासाठी देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये ४५ वर्षे वयोगट पुढे लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १८ वर्षे पुढे वयोगटाला परवानगी देण्यात आली व १५ वर्षे वयोगटाचेही नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे. एवढ्यातच तिसरी लाट आली व आता तिसरी लाट ओसरली असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे; मात्र कोरोनाला मात देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरूच असून, नवनवीन लसींना परवानगी दिली जात आहे. सध्या १५ वर्षे पुढे गटाचे लसीकरण सुरू असले तरी त्या खालील मुलांचे लसीकरण झालेले नाही. अशातच आता चीन व साऊथ कोरिया या देशांमध्ये कोरोना उद्रेक परत वाढला असून, अशात भारतात चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच आता १२-१४ वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत २५,९९४ मुलांचे लसीकरण करण्यात आले असून, त्याची ५८.८६ एवढी टक्केवारी आहे. 

४९,१०० मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट - जिल्ह्यात ९०९ शाळांमधील १२-१४ वयोगटातील अपेक्षित लाभार्थी शहरी भागात ७,२०० तर ग्रामीण भागात ४१,९०० असे एकूण ४९,१०० आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळांमध्ये केले जात आहे. याचबरोबर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्येही लस उपलब्ध करवून देण्यात आली आहे. 

ही मुले आहेत लसीकरणासाठी पात्र - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी चौथ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. म्हणून ज्या मुलांचा जन्म १ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० या कालावधीत झाला आहे, अशी सर्व मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत. यामुळे पालकांनी याकडे लक्ष देत त्यांच्या मुलांचे लसीकरण करवून घेणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या