शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

५८१ शाळांना हवी सुरक्षाभिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:04 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी व शाळांची सुरक्षा धोक्यात : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिर्ण वर्गखोल्या व सुरक्षाभिंतीचा अभाव या दोन्ही बाबी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. मात्र तरिही जिल्हा परिषदेचे या गंभीर बाबींकडे सपशेल दुर्लक्ष आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाल्या असा उदोउदो करण्यात आला. शासनाची कवडीही न लागता लोकांच्या खिशातून पैसा काढून या शाळा डिजीटल करण्यात आल्या. प्रत्येक शाळेतील एकतरी खोली डिजीटल असावी यासाठी शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विभागाशी संबधीत अधिकारी, पाधिकारी व कर्मचारी यांचा आग्रह होता. आपली मुले ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल यासाठी लोकांनी स्वत:च्या खिशातील पैसे डिजीटल शाळांसाठी दिले. यातुनच जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजीटल झाल्यात.परंतु वास्तविक परिस्थीती पाहता ‘पुढे पाठ- मागे सपाट’ हीच स्थिती जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळांपैकी फक्त ४०० शाळांमध्ये पक्की सुरक्षाभिंत आहे. ३६ शाळांची सुरक्षाभिंत तुटलेली आहे. शाळेची सुरक्षाभिंत म्हणून ४२ शाळांमध्ये फक्त तारांचे कुंपन लावण्यात आले. तर १० शाळांच्या सुरक्षाभिंतीचे काम सुरू आहे. सुरक्षाभिंतीची मागणी करूनही जिल्हा परिषदेने सुरक्षाभिंतीची सोय मागील अनेक वर्षांपासून करून दिली नाही. परिणामी, त्याचा पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने आपापल्या शाळेत मेहंदीच्या झाडाचे कुंपन तयार केले.जिल्ह्यातील १३२ शाळांमध्ये मेहंदीच्या झाडाचे कुंपन आहे. १६३ शाळांमध्ये सुरक्षाभिंतच नाही. ६ शाळांमध्ये सुरक्षाभिंत म्हणून इतर सोय करण्यात आली. २८० शाळांच्या आजूबाजूला अर्ध्या परिसरात घरे असल्यामुळे त्या शाळांची अर्धी सुरक्षा आपोआपच झाली. परंतु अर्धी सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षाभिंती अभावी विद्यार्थ्यांना कधीही धोका होण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी शाळा तलावाच्या काठावर आहेत. काही ठिकाणी विद्युत डीपीच्या जवळ आहेत. काही शाळा पहाडावर आहेत. विद्यार्थ्यांना धोका होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेला सुरक्षाभिंतीची गरज आहे.यासंदर्भात शाळेकडून जि.प.सदस्य, शिक्षण सभापती, जि.प. अध्यक्षांना वारंवार मागणी केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ५८१ शाळा सुरक्षाभिंत विना आहेत.सर्वाधिक शाळा गोंदिया तालुक्यातीलजिल्हा परिषदेच्या आमगाव तालुक्यात एकूण ११६ शाळा असून त्यापैकी ५० शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकूण १३८ शाळा असून ७८ शाळांमध्ये तसेच देवरी तालुक्यातील एकूण १४४ शाळांपैकी ८५ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. गोंदिया तालुक्यात एकूण १८८ शाळा असून १०७ शाळांमध्ये, गोरेगाव तालुक्यात एकूण १०९ शाळा असून ५९ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. सडक-अर्जुनी तालुक्यात एकूण ११५ शाळा असून ५५ तसेच सालेकसा तालुक्यात एकूण १२० शाळा असून ६६ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. तिरोडा तालुक्यात एकूण १३९ शाळा असून ८१ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. अशाप्रकारे गोंदिया जिल्ह्यात एकूण १०६९ शाळा असून ५८१ शाळांमध्ये सुरक्षाभिंती नाहीत.१७२ शाळांचा वीज पुरवठा खंडितवीज बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील १७२ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात आमगाव तालुक्यातील २७, अर्जुनी-मोरगाव ३, देवरी ३५, गोंदिया २४, गोरेगाव १८, सडक-अर्जुनी १३, सालेकसा ५१ व तिरोडा तालुक्यातील १ शाळेचा समावेश आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा