सर्वाधिक चुरस गोंदियात : चारही मतदार संघात ३८ उमेदवारांची माघारगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणाऱ्यांसाठी माघार घेण्याची आज शेवटची संधी होती. त्यामुळे दुपारी ३ पर्यंत ९२ उमेदवारांपैकी ३८ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. आता ५४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक १९ उमेदवार गोंदिया मतदार संघात, तिरोडा मतदार संघात १४, अर्जुनी मोरगाव मतदार संघात १३ तर आमगावमध्ये ८ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी नामांकन मागे घेणाऱ्यांमध्ये अपक्षांचा भरणा होता. पक्षीय चिन्हावर लढणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. विशेष म्हणजे शिवाय पक्षाची तिकीट मिळण्याच्या आशेने निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केलेल्या काही बंडखोर उमेदवारांनीही नामांकन कायम ठेवले आहे. त्यात तिरोड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर दिलीप बन्सोड, अर्जुनी मोरगावमधून काँग्रेसचे रत्नदीप दहीवले, अजय लांजेवार, देवरीतून भाजपाचे सहेसराम कोरोटे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. मात्र अर्जुनी मोरगाव मतदार संघातून भाजपाचे पोमेश रामटेके, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलन राऊत, तिरोड्यातून काँग्रेसचे राधेलाल पटले यांनी मात्र माघार घेतली आहे. त्यामुळे बंडखोरांची ही उमेदवारी पक्षीय उमेदवारांना डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे दिलीप बन्सोड यांनी पक्षाचा राजीनामा देत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.जिल्ह्यातील चारही मतदार संघांमध्ये आता निवडणूक रिंगणात कायम असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.अर्जुनी मोरगावअर्जुनी मोरगाव मतदारसंघातून किरण यशवंत कांबळे (शिवसेना), राजेश मुलचंद नंदागवळी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजकुमार सुदाम बडोले (भारतीय जनता पार्टी), मनोहर गोवर्धन चंद्रीकापुरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), भिमराव कारूजी मेश्राम (बहुजन समाज पार्टी), धनपाल मिठू रामटेके (भारिप बहुजन महासंघ), अजय संभाजी लांजेवार (अपक्ष), प्रमोद हिरामन गजभिये (अपक्ष), जगन ऊर्फ जयेश बारसू गडपाल (अपक्ष), रत्नदिप सुखदेवकुमार दहिवले (अपक्ष), दिलवर कुंजीलाल रामटेके (अपक्ष), इंजि. दिलीपकुमार ललदास वालदे (अपक्ष), महेश ताराचंद शेंडे (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक लढतीत कायम आहेत.गोंदियागोंदिया मतदार संघात गोपालदास शंकरलाल अग्रवाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनोद संतोषकुमार अग्रवाल (भाजप), राजकुमार संतपराव कुथे (शिवसेना), करुणाताई मिलिंद गणवीर (कॉम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया), अशोक लक्ष्मीनारायण गुप्ता (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), योगेश माधवराव बन्सोड (बसपा), गोपाल तुकाराम उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), विनोदकुमार मनोहर नंदूरकर (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), चिंधूजी लखाजी उके (अपक्ष), संतोष कामताप्रसाद उमरे (अपक्ष), सुरेशकुमार खिंदूलाल चौरागडे (अपक्ष), छैलबिहारी मातादीन अग्रवाल (अपक्ष), धमेंद्र सुखदेव गजभिये (अपक्ष), नामदेव मोतीराम बोरकर (अपक्ष), नारायण पुरनलाल पटले (अपक्ष), दिगंबर सुनऊ पाचे (अपक्ष), लक्ष्मण पांडुरंग मेश्राम (अपक्ष), मंगल बाबुलाल मस्करे (अपक्ष), राजू रुपचंद ठकरेले (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत. तिरोडातिरोडा मतदारसंघातून परसराम ग्यानीराम कटरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), राजलक्ष्मी राजेशकुमार तुरकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), पंचम तानुजी बिसेन (शिवसेना), विजय भरतलाल रहांगडाले (भारतीय जनता पार्टी), दीपक हिरालाल हिरापुरे (बसपा), कादीर शेख खलीफ शेख (मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टी), विरेंद्र कस्तुरचंद जायस्वाल (पिझन्ट्स अॅन्ड वर्कर्स पार्टी आॅफ इंडिया), अविनाश रामदास नेवारे, प्रताप तिलकचंद पटले, दिलीप वामन बन्सोड, राजकुमार ईश्वरलाल बोहणे, मनोहर फुलचंद पटले, श्रावण आसाराम रहांगडाले, सुरेश दादू टेंभरे या उमेदवारांनी माघार घेतली नाही.आमगावआमगाव मतदारसंघातून मुलचंद हरिचंद गावराणे (शिवसेना), रमेश नारायण ताराम (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय हनवंतराव पुराम (भाजपा), रामरतनबापू भरतराजबापू राऊत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), शारदा उदेराम उईके (बसपा), केशवकुमार लक्ष्मणराव भोयर (अपक्ष), सहसराम मारोती कोरोटे (अपक्ष), संतोष महितपराव नाहाके (अपक्ष) असे आठ उमेदवार रिंगणात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
५४ उमेदवारांमध्ये होणार लढत
By admin | Updated: October 1, 2014 23:24 IST