शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

५१ चिमुकल्यांना मिळाले आई-वडिलांचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:31 IST

मुलांच्या आश्रमशाळा, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांवर करडी नजर ठेवून त्या मुलांमध्ये अपहरण झालेले किंवा बेपत्ता झालेले बालके ........

ठळक मुद्देपाचव्या आॅपरेशन मुस्कानची फलश्रृती : आठ वर्षात ७६३ बालके शोधले

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुलांच्या आश्रमशाळा, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांवर करडी नजर ठेवून त्या मुलांमध्ये अपहरण झालेले किंवा बेपत्ता झालेले बालके तर नाहीत ना याचा शोध पोलीस आॅपरेशन मुस्कानच्या माध्यमातून घेत आहे.महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्हा पोलिसांनी यापूर्वी राबविलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये ५१ चिमुकल्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. ज्यांचे आई-वडील नाहीत त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.१ ते ३१ जुलै २०१५ या महिनाभरात पहिले आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले. या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेले २ मुले व १२ मुली अश्या १४ बालकांचा शोध घेण्यात आला. तर रेकार्ड व्यतिरिक्त १२ मुले व ५ मुलींचा असे १७ मिळून एकूण ३१ बालकांचा शोध पहिल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये लागला. १ ते ३१ जानेवारी २०१६ या महिनाभरात दुसरे आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेल्या एकाही बालकाचा शोध घेता आला नाही. परंतु रेकार्ड व्यतिरिक्त ३ मुले व ३ मुलींचा असे ६ बालकांचा शोध घेण्यात आला. १ ते ३० एप्रिल २०१६ या महिनाभरात तिसरे आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेल्या मुला-मुलींपैकी १ मुलगी व रेकार्ड व्यतिरिक्त १ मुलगा अश्या २ बालकांचा शोध घेण्यात आला.१ ते ३१ जून २०१६ या महिनाभरात चवथे आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेले ४ मुले तर रेकार्ड व्यतिरिक्त २ मुले व १ मुलगी असे ७ बालकांचा शोध घेण्यात आला. १ ते ३१ जुलै २०१७ या महिनाभरात पाचवे आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.या आॅपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांच्या रेकार्डवर बेपत्ता असलेले १ मुलगा व ३ मुली तर रेकार्ड व्यतिरिक्त १ मुलगी असा ५ बालकांचा शोध घेण्यात आला. पाचही आॅपरेशनमध्ये ५१ बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.आठ वर्षात ७८३ बालके परतलीगोंदिया जिल्ह्यात सन २०१० पासून ते ३० जून २०१५ या काळात बेपत्ता झालेल्या किंवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेण्यात आला. या काळात २४७ मुले व ५११ मुली बेपत्ता झाल्या होत्या. काहींचा शोध लागला. काही स्वत:हून घरी परतले. सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले आणि ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या.त्यापैकी २३९ मुले व ४९३ मुली पोलिसांना सापडल्या होत्या. त्यानंतर राबविलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये ५१ बालके पोलिसांच्या हाती लागली आहेत.बेपत्ता बालकांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करीतच आहे. परंतु रेल्वे गाडीत, गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन बालके संशयास्पद आढळले. त्यांच्या चेहºयावर भय वाटले अथवा ते स्वत:ला असुरक्षीत समजत असतील तर त्यांची तत्काळ माहिती पोलिसांना द्यावी.हरिष बैजलपोलीस अधीक्षक गोंदिया.

टॅग्स :Policeपोलिस