शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तलावांत ५० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 01:54 IST

पूर्वीपासून जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिल्ह्यात शेकडो लहान-मोठे तलाव आहेत

पाणीसाठ्यात घट : मासेमारी व्यवसाय ठप्प रावणवाडी : पूर्वीपासून जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. जिल्ह्यात शेकडो लहान-मोठे तलाव आहेत व या तलावांच्या भरवशावरच ढिवर समाजाचा मासेमारी व्यवसाय चालत असतो. परंतु आतापर्यंत तलाव पावसाच्या पाण्याने भरलेच नसल्यामुळे पिढीजात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ढिवर समाजावर संकट उभे ठाकले आहे. पिढ्यानपिढ्या मासेमारी करणारा भोई ढिवर समाज शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे हा समाज आणि त्याच्या व्यवसायाच्या अस्तीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ढिवर समाजाकडे चरितार्थासाठी पर्यायी व्यवसाय करण्याची व्यवस्था नसल्यामुळे ढिवर समाजावर उपासमारीची पाळी आहे. शासनाने जिल्ह्यातील सिंचनाच्या सुविधेकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही. पण मस्त्य व्यवसायासाठीही आवश्यक ती उपाययोजना केलीच नाही. त्यामुळे सर्वत्र मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात लहान-मोठे तलाव अस्तीत्वात आहेत. परंतु आतापर्यंत या तलावांमध्ये पावसाचे पाणी भरलेच नाही. त्यातही शेतीला पाण्याची आवश्यकता वाटली तर काही दिवसांतच ते ही कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. शासनाने तालुक्यातील प्रत्येक तलावात जास्तीतजास्त पाण्याची साठवण व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. तलावांची खोली व पाणी टिकून राहण्याची घनता यावर मासोळ्याचे उत्पादन अवलंबून असते, मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव व बोड्या अर्धवटच भरल्या असल्यामुळे याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झालेला दिसून येत आहे.(वार्ताहर)