शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

एका पोलीस ठाण्यावर ५० रेल्वेस्थानकांचा भार

By admin | Updated: December 22, 2014 22:48 IST

गोंदिया रेल्वे स्थानकाच्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ५० रेल्वे स्थानकांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. यात प्लॅटफॉर्म असलेल्या २१ रेल्वे स्थानकांचा समावेश असून इतर प्लॅटफार्म

गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाच्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ५० रेल्वे स्थानकांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. यात प्लॅटफॉर्म असलेल्या २१ रेल्वे स्थानकांचा समावेश असून इतर प्लॅटफार्म नसलेले किंवा लहान रेल्वे स्थानक आहेत. या पोलीस ठाण्यात केवळ ४० कर्मचारी-अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. हे केवळ ४० कर्मचारी-अधिकारी ५० रेल्वे स्थानकांचा भार कसे सांभाळत असतील? याची कल्पना न केलेलीच बरी.गोंदिया रेल्वे पोलीस विभागाचे कार्यक्षेत्र रायपूर-नागपूर मार्गावर दर्रेकसा रेल्वे स्थानकापासून भंडारा रोड रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास १५० किमीच्या अंतरापर्यंत आहे. तसेच चंद्रपूर मार्गावर वडेगाव रेल्वे स्थानक व बालाघाट जिल्ह्यापर्यंत येथील पोलिसांना काम सांभाळावे लागते. तसेच तुमसर रोड रेल्वे स्थानक ते तिरोडीपर्यंत एका वेगळ्याच मार्गावर या कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. तसेच गोंदिया रेल्वे स्थानकातून जवळपास ६० रेल्वे गाड्या दरदिवशी जातात. या गाड्यांमध्ये गुन्हे न घडले तर ठिक, परंतु गुन्हे घडले तर तपास व चौकशी करण्याची पाळी याच पोलीस कर्मचाऱ्यांवर येते. तपासकार्यासाठी त्यांना नेहमी राज्याच्या बाहेर जावे लागते. त्यासाठी एवढ्या कमी संख्येतील कर्मचाऱ्यांना निश्चितच तारेवरची कसरत करावी लागते. गोंदियाच्या रेल्वे पोलीस ठाण्यात अधिकारी म्हणून एकमेव सहायक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र येथे कमीत कमी तीन पोलीस निरीक्षक पदाचे अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. उल्लेखनिय म्हणजे गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्याचे रेल्वे स्थानक नक्षल प्रभावित क्षेत्रात येते. त्यासाठी या स्थानकावर अधिक सावधगिरी बाळगण्याचा दबाबसुद्धा गोंदिया रेल्वे पोलिसांना सहन करावा लागतो. अशावेळी रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकचा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. परंतु ही समस्या सुटण्याची चिन्हे दिसून येत नाही. (प्रतिनिधी)