शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षाच्या चिमुकलीला बॅड टच करणाऱ्या आरोपीला ५ वर्षाचा सश्रम कारावास

By नरेश रहिले | Updated: December 13, 2023 20:27 IST

आमगावातील आरोपी: विशेष सत्र न्यायालयाचा निकाल.

गोंदिया: आपल्या भावाला बोलावण्यासाठी गेलेल्या ७ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला विशेष सत्र न्यायालयाने ५ वर्षाचा सश्रम कारावास व ३ हजार रूपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी ११ डिसेंबर रोजी करण्यात आली. ही सुनावणी तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व विशेष सत्र न्यायाधीश एन.बी. लवटे यांनी केली आहे. अशोक नंदेश्वर (४०) रा. आमगाव असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीने ८ ऑक्टोबर २०१९ ला दुपारी २ वाजताच्या सुमारास पिडीतेला तिच्या आईने भावाला बोलावण्यासाठी पाठविले होते. ७ वर्षाची मुलगी ही बोलाविण्यास गेली असता आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. पिडितेने आपल्या आईला सांगितल्यावर तिच्या आईने आरोपी विरोधात आमगाव पोलिसात तक्रा केली. आमगाव पोलिसानी गुन्हा दाखल करून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सिंह यांनी केला. या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी पिडित पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता वसंतकुमार चुटे यांनी एकुण ५ साक्षदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून पिडितेतर्फे युक्तीवाद केला. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१ व विशेष सत्र न्यायाधीश एन.बी. लवटे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी अशोक नंदेश्वर (४०) ता. जि. गोंदिया याला शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई गजानन चौधरी यांनी केले. अशी सुनावली शिक्षा

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये ३ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड व व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १० अन्वये ५ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास, भादंविचे कलम ३५४ प्रमाणे ३ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :gondiya-acगोंदिया