शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दोघा मोटारसायकल चोरट्यांकडून ५ मोटारसायकली केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 22:56 IST

गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ग्रामीण व रावणवाडी परिसरात गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना विनायक नेवारे (रा.गिरोला) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली आहे व तो दासगाव-किन्ही परिसरात फिरत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. यावर पथकाने नेवारेचा शोध घेऊन त्याला दासगाव-किन्ही परिसरातून ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांकडून ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या जप्त करण्यात आलेल्या माेटारसायकलींची किंमत अडीच लाख रुपये सांगितली जाते. ही कारवाई  गुरुवारी (दि.३) स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ग्रामीण व रावणवाडी परिसरात गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना विनायक नेवारे (रा.गिरोला) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली आहे व तो दासगाव-किन्ही परिसरात फिरत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. यावर पथकाने नेवारेचा शोध घेऊन त्याला दासगाव-किन्ही परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर, त्याने नवेगाव, किरणापूर, लांजी (बालाघाट) येथून सर्व मोटारसायकली चोरून आणल्याचे सांगितले. त्याला एक विधीसंघर्षित बालक चोरीसाठी मदत करीत होता, तसेच रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या निर्देशांन्वये पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, पोलीस नायक महेश मेहर, पोलीस शिपाई संतोष केदार,  विजय मानकर, चालक पोलीस शिपाई पांडे यांनी केली आहे.

या मोटारसायकली केल्या जप्त- आरोपींनी लांजी  व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले असून, त्यांच्याकडून  एमपी ५०- एमव्ही ८८१० क्रमांकांची मोटारसायकल किंमत ४० हजार रुपये,  यूके ०५-बी ४३९२ क्रमांकाची मोटारसायकल किंमत ७० हजार रुपये, एमपी ५०-एमपी ७२१२, एमपी ५०-एमआर ५८७९ क्रमांकाची मोटारसायकल किंमत ७० हजार रुपये, विना क्रमांकाची एक मोटारसायकल किंमत ७० हजार हा माल जप्त केला आहे.

 

टॅग्स :Thiefचोर