लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील ७ महिन्यांत महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवासी यंदा घटल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रवासी लालपरीतून प्रवास करण्याचे का टाळत आहेत. हा संशोधनाचा विषय असून महामंडळाचे प्रवासी वाढवा अभियान अपयशी ठरत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.मागील ७ महिन्यांत गोंदिया आगाराच्या बसेसमधून ६७ लाख ८२ हजार ४५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. जेव्हा की, १ वर्षापूर्वी ७३ लाख २६ हजार ३८० प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. यावरून ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवाशांची घट दिसून येते. ही आकडेवारी जुलै ते जानेवारी या काळातील आहे. यातील, जुलै २०१८ मध्ये ९ लाख ५ हजार ५३८, आॅगस्टमध्ये १० लाख १ हजार १०१, सप्टेंबरमध्ये १० लाख ८ हजार १८९, आॅक्टोबरमध्ये ९ लाख २२ हजार ९२, नोव्हेंबरमध्ये ९ लाख २३ हजार १८८, डिसेंबरमध्ये ९ लाख ७४ हजार २०३ तर जानेवारी २०१९ मध्ये १० लाख ४१ हजार १४६ प्रवाशांनी गोंदिया आगाराच्या बसमधून प्रवास केला आहे.तर १ वर्षापूर्वी म्हणजेच, जुलै २०१७ मध्ये १० लाख ३४ हजार २२, आॅगस्टमध्ये ११ लाख १ हजार ३९१, सप्टेंबरमध्ये १० लाख ७१ हजार ३१४, आॅक्टोबरमध्ये ८ लाख ८९ हजार ६४, नोव्हेंबरमध्ये ९ लाख ९१ हजार ३४९, डिसेंबर मध्ये १० लाख ९१ हजार तर जानेवारी २०१८ मध्ये ११ हजार ४७ हजार ५१३ प्रवाशांनी प्रवास केला होता. या आकडेवारीवर नजर टाकल्यास, फक्त आॅक्टोबर महिन्यात सन २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये जास्त प्रवासी मिळाल्याचे दिसते. तर उर्वरीत मागील ६ महिन्यांत या वर्षापेक्षा अधिक तर यंदा कमी प्रवासी मिळाल्याचे दिसते.खासगी प्रवासी वाहनांमुळे फटकाजिल्ह्यात काळी-पिवळी व आॅटो सर्वसामान्यांपर्यंत पोहचले असून याचा फटका महामंडळाच्या प्रवासी संख्येवर पडत आला आहे. पूर्वी फक्त बालाघाट मार्गावर खाजगी बसेस धावत होत्या.मात्र आता आमगाव-देवरी मार्गावर खासगी बसेस धावत आहेत. याचा थेट फटका आगाराच्या प्रवासी संख्येवर बसत आहे. आगाराकडून प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न करून प्रवासांना अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र प्रवासी संख्येत घट होत असल्याने याचा काहीच फायदा मिळत नसल्याचे दिसत आहे.तिकीट विक्रीतून २० कोटी मिळालेगोंदिया आगाराला मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त आवक झाल्याचे दिसत आहे. यावर्षी सुमारे २० कोटी रूपये तिकीट विक्रीतून आगाराला मिळाले आहेत. तर मागील वर्षी सुमारे १८ कोटी रूपयांचे उत्पन्न झाले होते. यात जुलै महिन्यात यंदा २.९१ कोटी तर मागील वर्षी २.५३ कोटी, आॅगस्ट महिन्यात यंदा ३ कोटी तर मागील वर्षी २.५६ कोटी, सप्टेंबरमध्ये यंदा २.९५ कोटी तर मागील वर्षी २.५३ कोटी, आॅक्टोबरमध्ये यंदा २.८८ कोटी तर मागील वर्षी २.५९ कोटी, नोव्हेंबरमध्ये ३.४३ कोटी तर मागील वर्षी २.५६ कोटी, डिसेंबरमध्ये ३.२५ कोटी तर मागील वर्षी २.७७ कोटींचे उत्पन्न तिकीट विक्रीतून झाले आहे.
परिवहन महामंडळाचे ५ लाख प्रवासी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 9:07 PM
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील ७ महिन्यांत महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवासी यंदा घटल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रवासी लालपरीतून प्रवास करण्याचे का टाळत आहेत.
ठळक मुद्देमागील ७ महिन्यांतील आकडेवारी : वाढीव तिकीट दराने आवक वाढली