शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या हत्येसाठी 5 लाखाची सुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

गोंदिया शहरातील एनसीसी ट्रान्सपोर्टचे मालक अशोक बाबूलाल कौशिक (४५) हे आरोपी चिंटू शर्मा (३५) रा. सर्कस ग्राऊंडजवळ गोंदिया याच्या जिममध्ये जात होते. काही दिवसांपासून अशोक कौशिक नवीन टेक्नॉलॉजीची जिम चिंटू शर्मा यांच्या जिमच्या बाजूलाच टाकणार होते. यामुळे आपला व्यवसाय बुडेल या भीतीने चिंटू शर्मा याने पाच लाखात अशोक कौशिक यांची सुपारी दिली.  आरोपी सतीश बनकर (३०) रा. छोटा गोंदिया याने ही सुपारी पाच लाखात घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपला व्यवसाय बुडेल या भीतीने शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबूलाल कौशिक (४५) यांचा खून करण्यासाठी ५ लाखांची सुपारी देण्यात आली. त्या सुपारीचे २ लाख २० हजार रुपये आरोपीला मिळाले. सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी  सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गोंदिया शहरातील एनसीसी ट्रान्सपोर्टचे मालक अशोक बाबूलाल कौशिक (४५) हे आरोपी चिंटू शर्मा (३५) रा. सर्कस ग्राऊंडजवळ गोंदिया याच्या जिममध्ये जात होते. काही दिवसांपासून अशोक कौशिक नवीन टेक्नॉलॉजीची जिम चिंटू शर्मा यांच्या जिमच्या बाजूलाच टाकणार होते. यामुळे आपला व्यवसाय बुडेल या भीतीने चिंटू शर्मा याने पाच लाखात अशोक कौशिक यांची सुपारी दिली.  आरोपी सतीश बनकर (३०) रा. छोटा गोंदिया याने ही सुपारी पाच लाखात घेतली. त्या पाच लाखांपैकी २ लाख २० हजार रुपये सतीशला आरोपी दीपक भुते (३२) रा. छोटा गोंदिया याने नेऊन दिले. एका मोटारसायकलवर जाऊन सतीश बनकर याने सकाळी ७ वाजता गोंदियाच्या सर्कस मैदानावर मॉर्निंग वाॅक करीत असताना अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून त्यांचा खून केला. या  प्रकरणात आरोपी सतीश बनकर, जिम चालक चिंटू शर्मा व जिममधील असिस्टंट दीपक भुते या तिघांना गोंदिया शहर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे, सागर पाटील, सहाय्यक फौजदार घनश्याम थेर, पोलीस नायक जागेश्वर उईके, सुबोध बिसेन, योगेश बिसेन,विकास वेदक, अनिल कोरे, छगन विठ्ठले, भेंडारकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस