शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अध्यक्षपदासाठी ५ तर सदस्यांसाठी ५५ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:21 IST

येत्या १३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ तर १७ वॉर्डातील १७ सदस्य पदासाठी एकूण ५९ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

ठळक मुद्देनगर पंचायत निवडणूक : अध्यक्षपदासाठी भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरी

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : येत्या १३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ५ तर १७ वॉर्डातील १७ सदस्य पदासाठी एकूण ५९ उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.प्रथम नगराध्यक्ष बनण्याचा बहुमन येथे अनुसूचित जमातीला मिळणार असून यासाठी भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवाय दोन्ही पक्षाचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे हे बंडखोर कोणाचे गणित बिघडवतात हे बघावे लागेल. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी हलबीटोला येथील किशोर गावराने यांना उमेदवारी दिली आहे. परंतु भाजपचेच विरेंद्र उईके सुरुवातीपासून प्रबळ दावेदार होते व शेवटी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत टोपली हातात घेतली आहे.काँग्रेसनेही हलबीटोला येथील श्यामकला सुभाष प्रधान या महिला उमेदवाराला हात देऊन मतांचे गणित साधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु काँगे्रेसच्या सुनंदा मनोहर उईके बंडखोरी करीत टेबल निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरल्या आहेत. राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने जांभळी येथील विनोद मडावी यांना उमेदवारी देऊन भाजप आणि काँग्रेसमध्ये मत विभाजन होऊन आपल्याला लाभ मिळेल अशा अपेक्षेत आहे.सालेकसा नगर पंचायतीत एकूण ५ गावांचा समावेश असून नगर पंचायत पूर्णपणे ग्रामीण परिसरात आहे. यात मुरुटोलाटोला मुख्य मार्गावर असून बाकलसर्रा, जांभळी, सालेकसा(जुना) हलबीटोला ही गावे जंगल परिसरात व तालुका मुख्यालयापासून दूर आहेत.यात बाकलसर्रा आणि सालेकसा येथे प्रत्येकी २ प्रभाग आहेत. तर मुरुमटोला आणि जांभळी मध्ये प्रत्येकी ३ प्रभाग आहेत. परंतु हलबीटोला येथे एकूण ७ प्रभागांचा समावेश असून जवळपास निम्मे मत या एकाच गावी आहेत. त्यामुळे मतांचे गणित समोर ठेवून भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवार याच गावातून दिले आहे. तर अपक्ष लढणारे विरेंद्र उईके हे बाकलसर्रा, सुनंदा उईके या सालेकसा आणि राकाचे उमेदवार जांभळी येथे वास्तव्यात आहेत. त्यामुळे स्वत:च्या गावासह दुसºया गावी किती मते खेचून आणतील हे पाहावे लागेल. शिवसेनेने ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी कोणाला मदत करतील हे बघायचे आहे.नगरसेवक पदासाठी काँग्रेसने सर्व १७ प्रभागांत आपले अधिकृत उमेदवार उतरविले आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातून नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मते मिळतील अशी अपेक्षा ते करीत आहेत. तर भाजपने १७ पैकी १४ प्रभागात उमेदवार उभे केले असून प्रभाग क्रं. १, ६ आणि ८ मध्ये त्यांना उमेदवार मिळाला नाही. तरी या प्रभागातून नगराध्यक्ष पदासाठी मते खेचण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. काँग्रेस भाजप पाठोपाठ राष्टÑवादी काँग्रेसने ८ प्रभागात, शिवसेनेने ७ प्रभागात तर मनसेने १ प्रभागात आपला उमेदवार उभा केला आहे. तसेच टोपली चिन्हावर लढणारे १० आणि जग चिन्हावर लढणारे २ उमेदवार मैदानात आहेत.प्रभाग निहाय उमेदवारांची संख्या बघितली तर प्रभाग क्रमांक १, ६, १५ आणि १६ मध्ये प्रत्येकी फक्त २ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रभाग क्र.१ आणि ६ मध्ये भाजपचा उमेदवार नसून बंडखोर उभे आहेत. प्रभाग क्रमांक २, ३,४,५,८,१२,१४ आणि १७ मध्ये प्रत्येकी ४ उमेदवार मैदानात आहेत. प्रभाग क्रमांक ७,९ आणि १३ मध्ये प्रत्येकी ३ तर प्रभाग क्रमांक १० आणि ११ मध्ये प्रत्येकी ५ उमेदवार मैदानात आहेत. या दोन्ही वॉर्डामध्ये काही दिग्गज नेते व कार्यकर्ते आपले नशिब आजमावत आहेत. त्यामुळे सर्वांची नजर या प्रभागात जास्त राहणार आहे. तसेच मतांचे विभाजन अधिक होऊन फार कमी फरकाने जय-पराजय होण्याची दाट शक्यता आहे.ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी अपक्ष उभे असलेले उमेदवार काँग़्रेससोबत सामना करताना दिसतील. परंतु जर निवडून आले तर कोणाच्या गोट्यात जाऊस बसतील सांगणे कठिण आहे. प्रमुख पक्षांनी आपापले प्रचार कार्यालय सुरु करुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. कोणाचा नगराध्यक्ष बनेल व कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल हे मतगणनेनंतरच कळेल.