शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

उपचाराअभावी ५९ एड्स रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 21:51 IST

एड्सची लागण झालेल्या रुग्णांनी उपचार करण्यास नकार दिल्याने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात ५९ एड्स रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देएड्स रुग्णांच्या संख्येत वाढ : जनजागृतीचा अभाव, नागरिकांनी घ्यावी दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एड्सची लागण झालेल्या रुग्णांनी उपचार करण्यास नकार दिल्याने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात ५९ एड्स रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे एड्स आजाराबाबत अद्यापही जिल्ह्यात जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र आहे.शासनातर्फे एड्स आजाराबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविली जाते. शिवाय १ ते ७ डिसेंबर दरम्यान एड्स जनजागृती सप्ताह राबवून सर्वच ठिकाणी मार्गदर्शन शिबिर व उपचार पध्दतीची माहिती दिली जाते. मात्र यानंतरही एड्स आजाराबाबत नागरिकांमध्ये जागृकता आली नसल्याचे दिसते. एड्सवर उपचार पध्दती उपलब्ध असून बाधीत झालेल्या रुग्णांनी उपचार न घेतल्याने ५९ रुग्णांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एड्स समुदेशन केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये २१, २०१६-१७ मध्ये १८, २०१७-१८ मध्ये १३ आणि जुलै २०१८ पर्यंत ७ एड्स रुग्णांचा मृत्यू झाला आहे.यासर्व रुग्णांना एड्सची लागण झाल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीटीसी सेंटरमध्ये नि:शुल्क उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.मात्र त्यांनी उपचार न घेतल्याने या रुग्णांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यापर्यंत पोहचून व मार्गदर्शन करुन उपचारासाठी तयार करण्यात आयसीटीसी सेंटरचे कर्मचारी कमी पडले. एड्स आजाराबाबत अद्यापही भिती असून उपचार करुन घेण्यास रुग्ण संकोच बाळगतात. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जाते. परिणामी आरोग्य विभागाने अधिक जनजागृती करण्याची गरज आहे.उपचारा दरम्यान २३४ रुग्णांचा मृत्यूजिल्ह्यातील एड्स रुग्णांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. मागील तीन वर्षांत २३४ एड्स रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आयसीटीसी सेंटरमध्ये झाली आहे. २०१५-१६ मध्ये ६३, २०१६-१७ मध्ये ७५, २०१७-१८ मध्ये ५८ आणि जुलै २०१८ मध्ये ३८ एड्स रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आकड्यानी आरोग्य प्रशासनाची सुध्दा झोप उडाली आहे.पाच वर्षांत ७६१ एड्स रुग्णजिल्ह्यात मागील चार वर्षांत तपासणी दरम्यान ७६१ रुग्णांना एड्सची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी जिल्ह्यातील एड्स रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ही बाब चिंताजनक होत आहे. २०१४-१५ मध्ये २६ हजार ८४३ लोकांची तपासणी करण्यात आली. यात २११ एड्स बाधीत आढळले, २०१५-१६ मध्ये २८ हजार ८६९ लोकांची तपासणी करण्यात आली. यात १८२ एड्स बाधीत आढळले, २०१७-१८ मध्ये ३४ हजार २३१ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात १६५ एड्स बाधीत आढळले. जुलै २०१८ मध्ये ८ हजार ५८० रुग्णांचीे तपासणी करण्यात आली. त्यात ३४ एड्स बाधीत आढळले.राष्ट्रीय महामार्ग ठरत आहे कर्दनकाळगोंदिया जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ गेला आहे. या मार्गावर सडक अर्जुनी व देवरी तालुक्यातील काही गाव वसलेले आहे. या मार्गावर दिवसभर मुंबई-कलकत्ताकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाची वर्दळ असते. याच रस्त्यालगत देहव्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळेच जिल्ह्यात दरवर्षी एड्स रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग कर्दनकाळ ठरत आहे. सर्वाधिक एड्स बाधीत रुग्ण याच भागातील असल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.आता सुरू केली शोध मोहीमतपासणी दरम्यान एड्सची लागण झाल्याचे सिध्द झाल्यानंतर त्यांची आयसीटीसी सेंटरमध्ये नोंद केली जाते. त्यानंतर या रुग्णांचे समुपदेशन करुन उपचार केला जातो. मात्र मागील तीन वर्षांत एड्सची बाधा झालेल्या रुग्णांनी उपचार न घेतल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यामुळे एड्सची लागण झालेल्या रुग्णांचा शोध घेवून त्यांना उपचारासाठी प्रेरीत करुन आयसीटीसी सेंटरपर्यंत आणण्याची मोहीम १ जुलै २०१८ पासून राज्यभरात सुरू करण्यात आली असल्याचे आयसीटीसी सेंटरचे पर्यवेक्षक संजय जेणेकर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य