शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

हजार मुलांमागे ४८ मुली कमी

By admin | Updated: February 26, 2016 01:58 IST

मुलगी घरची लक्ष्मी अशी समज असलेल्या आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आता परिस्थिती बदलत आहे.

नरेश रहिले गोंदियामुलगी घरची लक्ष्मी अशी समज असलेल्या आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात आता परिस्थिती बदलत आहे. जिल्ह्यात प्रत्येक वर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. हीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात सामाजिक संतूलन ढासळणार आहे. आताच्या स्थितीत गोंदिया जिल्ह्यात दर हजारी पुरुषामागे मुलींची संख्या ९५२ आहे. हजार पुरूषाच्या मागे ४८ मुली कमी आहेत.जिल्ह्यात एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत एक हजार पुरूषांमागे ९५२ मुली जन्माला आल्या आहेत.सन २००१ व २०११ च्या जनगणनेनुसार महिला १००५ तर पुरूष ९९९ होते. १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ दरम्यान ७ हजार २८१ पुरूष तर ६ हजार ९३५ मुलींनी जन्म घेतला. मुलींच्या जन्मासंदर्भात सालेकसा व देवरी तालुक्यात चांगली स्थिती आहे. देवरी तालुक्यात ५६५ मुले व ५९७ मुलींनी जन्म घेतला. म्हणजेच दर हजारी मुलांमागे १०५७ मुलींनी जन्म घेतला. सालेकसा तालुक्यात ३२३ मुले व ३३९ मुलींनी जन्म घेतला. म्हणजेच दर हजारी पुरूषांमागे १०५० मुलींचा जन्म होत आहे. मुलींच्जा जन्मासंदर्भात सर्वात वाईट परिस्थिती सडक अर्जुनी तालुक्यात आहे. ४३९ मुलांमागे ३३५ मुलींंनी जन्म घेतला. येथे हजारी पुरूषांमागे मुलींचा जन्मदर ७६३ आहे. गोरेगाव तालुक्यात ३८९ मुलांमागे ३४१ मुलींनी जन्म घेतला. येथे हजारी पुरूषांमागे मुलींचा जन्मदर ८७७ आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ५३६ मुलांमागे ४७५ मुलींनी जन्म घेतला. या तालुक्यात हजारी पुरूषांमागे ८८६ मुलींची संख्या आहग. आमगाव तालुक्यात ४२८ मुलांमागे ३८४ मुलींनी जन्म घेतला. या तालुक्यात हजारी पुरूषांमागे ८९७ मुलींचा जन्म आहे. तिरोडा तालुक्यात ५२६ मुले व ४९६ मुलींनी जन्म घेतला. या तालुक्यात हजारी पुरूषांमागे ९४३ आहे. गोंदिया तालुक्यात ४ हजार ७५ मुले तर ३ हजार ९६८ मुलींनी जन्म घेतला. गोंदिया तालुक्याच्या हजारी पुरूषांमागे ९७४ मुलींचा जन्मदर आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करा अशी जनजागृती समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींकडून होत असली तरी जिल्ह्यातील परिस्थीती पाहिजे त्या प्रमाणात चांगली नाही. लींग चाचणीवर शासनाने कडक निर्बंध घातले तरी ज्या वस्तूला बंदी त्याची तेवढीच अधिक किंमत असते. लींग चाचणीवर निर्बंध असले तरी ८० हजारात हे कृत्य केले जात असल्याची चर्चा सद्या ऐकीवात आहे.