शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

४७ गावांचा पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:22 IST

आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, दुरुस्तीचे काम सुरू, बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तर मागील दोन दिवसांपासून ४७ गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावकऱ्यांना दूरवर भटकंती करावी लागत आहे.आमगाव तालुक्यातील ४७ गावांना बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. या योजनेची पाईप लाईन किडंगीपार नाल्याजवळ शुक्रवारी दोन ठिकाणी फुटली. परिणामी हजारो लिटर पाणी शेतांमध्ये वाहून गेली. त्यामुळे पाईप लाईन परिसरातील शेतांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रविवारी सकाळी सुध्दा या योजनेच्या फुटलेल्या पाईप लाईनमधून पाण्याचा अपव्यय सुरूच होता. संबंधित विभागाने पाईप लाईन दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र किडंगीपार नाल्याजवळ पाईप लाईनला मोठे भगदाड पडले असल्याने दुरूस्तीच्या कामाला विलंब लागत आहे. या योजनेतंर्गत आमगाव तालुक्यातील ४७ गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाईप लाईन फुटली असल्याने मागील दोन दिवसांपासून या गावांचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे भर पाणीटंचाईच्या कालावधीत नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. ही पाणी पुरवठा योजना बरीच जुनी असल्याने पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन सुध्दा काही ठिकाणी जीर्ण झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन ठिकाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. आमगाव तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई असून या योजनेमुळे ४७ गावातील गावकºयांना पाणीटंचाईवर मात करण्यास काही प्रमाणात मदत झाली होती. मात्र दोन दिवसांपासून या योजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने गावातील सार्वजनिक विहिरी, बोअरवेलवरील गर्दी वाढली आहे. पाईप लाईन दुरूस्तीचे काम लवकर पूर्ण न झाल्यास या परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाणीटंचाईच्या समस्येत भरआमगावात तालुक्यातील काही भागात मागील दोन तीन महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या आहे. गावातील महिला दोन तीन कि.मी.अंतरावरुन पाणी आणून आपली तहान भागवित आहेत. मात्र बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन फुटल्याने या परिसरातील पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई