नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना या कोरोनाच्या लढ्यासाठी १४ वित्त आयोगाच्या रकमेतून दिल्या जाणाऱ्या निधीचा व्याज शासनाला परत मागीतला आहे. कोणत्या ग्रामपंचायतला किती व्याज मिळाला याची माहिती मागीतली असता गोंदिया जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींपैकी ४६८ ग्रामपंचायतींच्या व्याजाची रक्कम ४ कोटी २ लाख २१ हजार ४०५ रूपये दिले आहेत. तर ७७ ग्रामपंचायतींच्या १४ वित्त आयोगाच्या निधीवर एकही व्याज मिळाले नसल्याची बाब पुढे आली आहे.कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शासनाला पैशांची नितांत गरज असल्यामुळे शासनाने नवीन कामावर बंदी घातली. सोबतच शासकीय खर्चाला देखील कात्री लावली. तर गाव विकासाची कामे करण्यासाठी दिलेल्या १४ वित्त आयोगाच्या निधीवर मिळणारे व्याज परत मागीतले आहे. जिल्ह्याला मिळालेल्या १४ वित्त आयोगाच्या रक्कमेवर ५ कोटी ६७ लाख ३१ हजार ९९८ रूपयांचे व्याज मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला पायाभूत सुविधा करण्यासाठी म्हणून शासनाकडून १४ वित्त आयोगाचा निधी मिळतो. हा निधी खर्च करताना मानव विकासाच्या कामांचे नियोजन केले जाते. केंद्रीय आयोगाच्या निर्देशानुसार हा निधी खर्च केला जातो. आमचे गाव आपला विकास, पिण्याचे पाणी, स्वच्छता, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधकाम, दिवाबत्ती व सौरदिव्यांची सोय, आवश्यक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी हा निधी दिला जातो. या निधीची रक्कम बँकेत जमा राहत असल्याने त्यावर ग्रामपंचायतींना व्याज मिळतो.गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १४ वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम शासनाला पाठविण्यात येणार आहे. गोंदिया तालुक्यातील २१ ग्रामपंचायत, तिरोडा तालुक्यातील ९, आमगाव तालुक्यातील २, सालेकसा तालुक्यातील ६, गोरेगाव तालुक्यातील २७, सडक-अर्जुनी तालुक्यातील १२ अशा ७७ ग्रामपंचायतींना एकही व्याज मिळाले नसल्याची बाब पुढे आली आहे.५.६७ कोटी देणार शासनाला१४ वित्त आयोगाच्या निधीवर मिळालेल्या व्याजाची रक्कम ५ कोटी ६७ लाख ३१ हजार ९९८ रूपये शासनाला परत पाठविण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायतींकडे असलेल्या रक्कमेवर ४ कोटी २ लाख २१ हजार ४०५ रूपये जिल्हा परिषदेला पाठविल्याची माहिती पंचायत समित्यांनी पंचायत विभागाला दिली. जिल्हा परिषदेकडे असलेल्या रकमेवर एक कोटी ६५ लाख १० हजार ५९३ रूपये असे एकूण ५ कोटी ६७ लाख ३१ हजार ९९८ रूपये व्याजाच्या स्वरूपात मिळाले आहेत. ते शासनाला परत पाठविले जाणार असून जिल्हा परिषदेकडून प्रक्रिया केली जात आहे.
४६८ ग्रामपंचायतींनी दिली ४ कोटी रुपयांची व्याजाची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शासनाला पैशांची नितांत गरज असल्यामुळे शासनाने नवीन कामावर बंदी घातली. सोबतच शासकीय खर्चाला देखील कात्री लावली. तर गाव विकासाची कामे करण्यासाठी दिलेल्या १४ वित्त आयोगाच्या निधीवर मिळणारे व्याज परत मागीतले आहे. जिल्ह्याला मिळालेल्या १४ वित्त आयोगाच्या रक्कमेवर ५ कोटी ६७ लाख ३१ हजार ९९८ रूपयांचे व्याज मिळाल्याची माहिती पुढे आली आहे.
४६८ ग्रामपंचायतींनी दिली ४ कोटी रुपयांची व्याजाची रक्कम
ठळक मुद्दे७७ ग्रामपंचायतीला एकही व्याज नाही : १४ वित्त आयोगाच्या निधीवर मिळाले व्याज