शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

झालुटोला सेवा सहकारी संस्थेत ४५ लाखांचा घोळ

By admin | Updated: June 22, 2016 01:37 IST

गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध कार्यकारी सेवा संस्था झालुटोला (रजि.११११) आहे. या संस्थेचे सन २००९ ते २०१२ या कालावधीत असलेले अध्यक्ष

कारवाईसाठी तक्रार : अध्यक्ष व गटसचिव यांचे संगनमतपरसवाडा : गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध कार्यकारी सेवा संस्था झालुटोला (रजि.११११) आहे. या संस्थेचे सन २००९ ते २०१२ या कालावधीत असलेले अध्यक्ष कुवरलाल हिरालाल बिसेन व गटसचिव डी.टी. डेडाऊ यांनी साठगाठ करून बोगस शेतकरी सभासद तयार करुन संस्थेत ४५ लाखांचा घोटाळा केला आहे. प्राप्त माहितीनुसार, झालुटोला, कारूटोला, खातीटोला या तीन गावांचे शेतकरी सभासद आहेत. जे शेतकरी सभासद असतात त्यांनाच पीक कर्ज देण्यात येते. पण या संस्थेत ४५ सभासद या तीन्ही गावांचे, परिसराचे व अस्तित्वात नाहीत. त्यांच्या नावाने बोगस सातबारा, आठ अ, ओळखपत्र, फोटो, बँकेतही खोटी स्वाक्षरी, कर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्र बोगस तयार करून ४५ लाखांची उचल गटसचिव डी.डी. डेडाऊ, तत्कालीन अध्यक्ष कुवरलाल बिसेन व तत्कालीन शाखा व्यवस्थापक, सेवानिवृत झालेले निरीक्षक तिडके निरीक्षक व इतर लोकांनी मिळून केले आहे. नवीन संचालक मंडळ यांनी सचिव हेडाऊ यांना सभेत, संस्थेवर एवढे थकीत कर्ज व कर्जदार शेतकऱ्यांची नावे सांगा, असे विचारण्यात आले. यावर त्यांची समजूत घालून कर्ज परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन करू, असे सांगितले. पण वास्तव बघितले असता सदर कर्जदार शेतकरीच गावाचे, परिसराचे, आजुबाजूचे, ओळख नसलेले व अस्तित्वातच नसलेले आढळले. कुठले? कोण? काही पत्ता नाही. बापाचे व शेतकऱ्यांचे आडनाव वेगळे. स्वत:च्या मनाने आपल्या अधिकाराने नावे लिहून सर्वकाही सचिवाने केले. ऐवढा घोळ करूनही उंच मान करून सचिव फिरतो.याबाबतची तक्रार वर्तमान संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रीतिचंद चौधरी, प्रकाश कावळे, विजय पिपरेवार, चोपराम कावळे, राजकुमार बिसेन, अरविंद रामटेके, सुरज बारेवार, पृथ्वीराज कटरे, जगदिश श्रीवास्तव, गणपत बिसेन, अर्चना ठाकरे, कांता बिसेन यांनी जिल्हा उपनिबंधक, आयुक्त यांना केली. पण घोटाळा होऊनही फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही. गटसचिव डी.डी. हेडाऊ यांच्या मोबाईल (९७६५१५२०१३) क्रमांकावर संपर्क केला असता त्यांनी राँग नंबर सांगितले. संस्थेचे सदस्य प्रकाश कावळे, विजय पिपरेवार यांनी सचिव यांना सर्व प्रकारची समजूत घातली. त्यांना ४५ लाख त्वरित भरून प्रकरण मिटवा, असे सांगितले. पण ते ऐकण्यास तयार नाही. तक्रार करण्यात आली, पण उपनिबंधक गोंदिया सहकार विभाग यांनीही आतापर्यंत कारवाई केली नाही. यात मोठ्या नेत्यांचा व चांगली मोठी मानसे, अधिकारी असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सातबारा तयार करणारा, ओळखपत्र, खाते उघडणारा, फोटो, स्वाक्षरी, पैसे घेणारा, काढणारा मुख्य सूत्रधार कोण? नियोजन करणारा मास्टर मार्इंड कोण? त्यांची संपूर्ण चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गावातील शेतकरी व संचालक मंडळ यांनी निबंधक गोंदिया यांना केली आहे. (वार्ताहर)