शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ४३ वर्षाचा सश्रम कारावास; १२ हजाराचा दंडही ठोठावला

By नरेश रहिले | Updated: December 19, 2023 18:47 IST

८ ऑगस्ट २०२० रोजी ६ वर्ष ९ महिन्याची पिडीत मुलगी मोठी बहीन व भावासोबत घरीच होती.

गोंदिया : आई-वडील कामावर गेले भावंडे घरीच असतांना लपंडाव खेळतांना एका ७ वर्षाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ४३ वर्षाचा सश्रम कारावास व १२ हजार रूपये दंड ठोठावला. संजय राऊत (२३) ता. जि. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे. ही सुनावणी १९ डिसेंबर रोजी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी केली आहे.

८ ऑगस्ट २०२० रोजी ६ वर्ष ९ महिन्याची पिडीत मुलगी मोठी बहीन व भावासोबत घरीच होती. पिडित मुलगी शेजारचा मुलीसोबत लपंडाव खेळत असतांना दुपारच्या वेळेला आरोपी संजय राऊत याने पिडितसोबत खेळणाऱ्या मुलींना धमकावून घरी जाण्यास सांगितले. पिडितेला स्वत: घरी नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. यासंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरिक्षक रोहिदास भोर यांनी केला होता. आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी ७ साक्षदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली. आरोपीचे वकील व अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरूध्द कागदोपत्री पुरावे साक्षदांराचे बयान ग्राहय धरून शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिगंळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार आत्माराम टेंभरे यांनी सहकार्य केले. अशी सुनावली शिक्षाभादंविच्या कलम ३७६ (अ) (ब) अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम ५०६ अंतर्गत ३ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिन्याचा अतिरिक्त कारावास, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६ अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास सुनावला आहे. कामाबरोबर लहान मुलांकडेही लक्ष द्या- पारधीया प्रकरणात पिडितेचे वय हे ७ वर्षापेक्षा कमी असून आरोपीचे वय १९ वर्षे होते. आरोपी त्याच गावातील रहिवासी होता. अल्पवयीन चिमुकली तिच्या मैत्रीणी सोबत खेळत असता व कोणताही मोठा व्यक्ती तेथे नव्हते. सर्व गावकरी शेतावर परे रोवणी लावण्यास शेतावर गेले असल्याचा फायदा घेऊन आरोपीने पिडितेवर लैगिंक अत्याचार केला. पालकांनी व इतर गावातील लोकांनी आपले काम करावे परंतु सोबतच लहान मुलांची काळजी घेणे देखील तेवढेच म्हत्वाचे आहे. - कृष्णा डी. पारधी, अतिरिक्त सरकारी वकील, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCourtन्यायालय