शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४१० शाळा ‘अ’ श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:51 IST

शाळेच्या भौतिक, गुणवत्ता व इतर सर्व उत्थानासाठी असलेल्या ९९९ प्रश्नांचे समाधान करणाऱ्या शाळांना शाळा सिद्धीमध्ये श्रेणी दिली जाते. या शाळा सिद्धीच्या ‘अ’ श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४१० शाळा आहेत.

ठळक मुद्देशाळासिद्धी उपक्रम : शाळांची श्रेणी उंचाविण्याकरिता प्रोत्साहन

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शाळेच्या भौतिक, गुणवत्ता व इतर सर्व उत्थानासाठी असलेल्या ९९९ प्रश्नांचे समाधान करणाऱ्या शाळांनाशाळा सिद्धीमध्ये श्रेणी दिली जाते. या शाळा सिद्धीच्या ‘अ’ श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४१० शाळा आहेत. शाळा सिद्धीच्या ९९९ प्रश्नांमध्ये ९० ते १०० टक्के खºया उतरणाºया या शाळांचा आदर्श इतर शाळांना घेण्याची गरज आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करणे, शाळा डिजीटल करणे, ६ ते १४ वर्षापर्यंत प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी विकसित करणे, प्रत्येक शाळेत स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर देणे, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पनाशक्तीची गती वाढविण्यासाठी, शैक्षणिक साहित्यावर भर देणे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाकडे आकर्षीत करणे, कठिण विषयात विद्यार्थ्यांना रूची निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करणे या विषयांवर भर देण्यात येते.परंतु शाळा सिद्धी अंतर्गत शाळेतील भौतिक सुविधा, शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची सुरक्षीतता, शौचालय, स्टडी रूम अशा विविध ९९९ प्रश्नांची प्रश्नावली असते. या ९९९ प्रश्नांच्या प्रश्नावलीत १०० टक्के खºया उतरणाºया गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळांपैकी ४१० शाळा आहेत. या सर्व शाळांना ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे. शाळेचे सामर्थ्यस्त्रोत, अध्यापन, अध्ययन आणि मुल्यांकन, विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास, शिक्षकांची कामगीरी आणि व्यवसाय विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, समावेशन, आरोग्य आणि संरक्षण, उत्पादक समाजाचा सहभाग या ७ क्षेत्रातील ४६ मानकात ९९९ प्रश्न तयार करण्यात आले.त्या प्रश्नाच्या उत्तरात ९० ते १०० टक्के खरे उतरणाऱ्या शाळांना ‘अ’ श्रेणी देण्यात आली. त्यानंतर ८९ ते ८० गुण घेणाऱ्या शाळांना ‘ब’ श्रेणी, ७९ ते ६० टक्के गुण घेणाºया शाळांना ‘क’ श्रेणी, ५९ ते ४० टक्के गुण घेणाºया शाळांना ‘ड’ श्रेणी देण्यात आली आहे. उर्वरीत शाळांची श्रेणी उंचाविण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.‘जिल्ह्यातील शिक्षकांच्या मेहनतीमुळे गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक उठाव क्रांती होत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा जि.प. शाळेतच दाखला करावा यासाठी जि.प. शाळांच्या विशेष उत्थानाकडे लक्ष आहे.-उल्हास नरडशिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. गोंदिया

टॅग्स :Schoolशाळा