शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

७५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते.

ठळक मुद्देदुसऱ्या गणवेशाचे २ कोटी २६ लाख रुपये अडले : विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाचे दिले पैसे

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गरीब श्रीमंत अशी दुफळी दूर करण्यासाठी शासनाने शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना गणवेशात येण्याचे नियम लावले.जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येतात. यासाठी एका गणवेशाकरिता ३०० रूपये असे दोन गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासनाकडून दिले जाते. मात्र यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीकडे वळते करण्यात आली. परंतु ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांचा दुसऱ्या गणवेश देण्यासाठी आतापर्यंत शासनाने पैसे दिलेच नसल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे अपेक्षीत होते. परंतु शाळा सुरू होऊन तीन महिने लोटत असतांना एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांनाकडे वळते करण्यात आले. त्यातही अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यातच आले नाही.दुसºया गणवेशाची रक्कम शासनाकडून शिक्षण विभागाला आलीच नाही.त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे देण्यात आले नाही.गोंदिया जिल्ह्यात जि.प.शाळांत शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार ५३६ मुली, अनुसूचित जातीचे ४ हजार ५४४ मुले, अनुसूचित जमातीचे ६ हजार ७१९ मुले व दारिद्रय रेषेखालील २२ हजार ४७७ मुले अशा एकूण ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश द्यायचे होते. दोन गणवेशापैकी एका गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितींच्या खात्यात टाकल्याचे सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारी सांगत आहेत.परंतु अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. गणवेशाचे पैसे मिळाले तर विद्यार्थ्यांना निदान एक गणवेश तरी आतापर्यंत का देण्यात आला नाही. दुसऱ्या गणवेशाच्या रकमेसाठी शासनाकडून कार्यवाही का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.२ कोटी २६ लाख रुपयांची गरजजिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश देण्यासाठी २ कोटी २५ लाख ८२ हजार ८०० रूपयाची गरज आहे. एवढा निधी शासनाने पाठविल्याशिवाय दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना देता येणार नाही. एका गणवेशामागे ३०० रूपये शासन देत आहे. परंतु तेही गणवेशाची रक्कम शाळा सुरू होऊनही दिली नसल्याने काही ठिकाणचे विद्यार्थी आठवडाभर एकाच गणवेशात शाळेत जातात. तर काही ठिकाणी व्यवस्थापन समित्यांकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले नाही.

टॅग्स :Schoolशाळा