शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ४ वसतिगृहांना मिळाली हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:45 IST

विशेष समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व राहण्याची सोय व्हावी म्हणून जिल्ह्यात आठ वसतिगृह उभारण्यात आले आहे. परंतु वर्षानुवर्षे भाड्याच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहांतील ६ वसतिगृहांना स्वतच्या हक्काची जागा मिळाली आहे.

ठळक मुद्दे८ पैकी ६ वसतिगृहांना हक्काची जमीन : दोन वसतिगृहांचा प्रश्न लवकरच सुटणार

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विशेष समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व राहण्याची सोय व्हावी म्हणून जिल्ह्यात आठ वसतिगृह उभारण्यात आले आहे. परंतु वर्षानुवर्षे भाड्याच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहांतील ६ वसतिगृहांना स्वतच्या हक्काची जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे, या वर्षभरात यातील चार वसतिगृहांना स्वत:ची जागा मिळाली आहे.गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचीत जमातीतील हजारो विद्यार्थी या वसतिगृहात राहून शिक्षण घेतात. वर्षानुवर्षापासून हे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत होते. घरमालकाने इमारत सोडण्यात सांगितले तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वसतिगृहाचे साहित्य हलवावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होत होते. परंतु आता या आठ पैकी सहा वसतिगृहांना हक्काची जागा मिळाली आहे. उर्वरीत दोन वसतिगृहांना जागा मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू आहे.सुरूवातीला गोंदियातील मुले व मुलींचे वसतिगृह या दोनच वसतिगृहांकडेच स्वत:ची जागा होती. तर सहा वसतिगृहांना भाड्याच्या इमारतीतूनच चालवावे लागत होते. परंतु पालकमंत्री राजकुमार बडोले हे सामाजिक न्याय मंत्री असल्याने त्यांनी याकडे विशेष लक्ष घालून हक्काची जागा नसलेल्या सहा पैकी चार वसतिगृहांना जागा मिळवून दिली आहे. यात, अर्जुनी-मोरगाव येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सडक-अर्जुनी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व तिरोडा येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला हक्काची जागा मिळवून देण्यात आली आहे. वनविभाग व महसूल विभागाच्या जागेवर हे वसतिगृह उभारण्यात येत आहे.वर्षभरात वसतीगृह ०.९८ हे.आर जागेत तयार करण्यात येणार आहे. या प्रत्येक वसतिगृहासाठी एवढी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.देवरी व कुडवा येथील वसतिगृहांचा प्रश्न सुटणारगोंदिया जिल्ह्यातील आठ पैकी सहा वसतिगृहांना हक्काची जागा मिळाली आहे. परंतु देवरी येथील मुलींच्या वसतिगृहासाठी वनविभागाची जागा मागीतली जात असून त्यासाठी वनविभागाची कार्यवाही सुरू आहे. तर लगतच्या ग्राम कुडवा येथील नवीन वसतिगृहाला महसूल विभागाची जागा मिळवून देण्यासाठीही प्रक्रिया सुरू आहे.निवासी शाळाही स्वत:च्या जागेवरअर्जुनी-मोरगाव येथील निवासी शाळेला हक्काची जागा असावी यासाठी नामदार बडोले यांनी प्रयत्न करून जागा मिळवून दिली. बहुतांश जागा वनविभागाची असून मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी असलेल्या निवासी शाळा व वसतिगृहाच्या उत्थानासाठी उपवनसंरक्षकांनी विशेष सहकार्य केल्यामुळे विशेष समाज कल्याण विभाग वनविभागाच्या अधिकाºयांचा गौरव करणार आहे.भाड्याच्या इमारतीत असलेल्या ४ वसतिगृह व एक निवासी शाळेला हक्काची जागा मिळाली आहे. उर्वरतीत दोन वसतिगृहांचा जागेच्या प्रश्नांसंदर्भात कार्यवाही सुरू असून हा प्रश्न लवकरच सुटणार आहे.-मंगेश वानखेडेविशेष समाज कल्याण अधिकारी, गोंदिया.