शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळेतील ३९५ विद्यार्थी जि.प.शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:44 IST

बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा यशस्वी झाल्याने आता जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या रोडावण्याचे बरेच प्रमाण कमी झाले आहे.

ठळक मुद्देशाळा झाल्या बोलक्या : विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यावर भर

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा यशस्वी झाल्याने आता जिल्हा परिषदेची विद्यार्थी संख्या रोडावण्याचे बरेच प्रमाण कमी झाले आहे. काही जि.प. शाळांतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाला पाहून खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा कल जि.प. शाळांकडे वाढला आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात खासगी शाळांतील ३९५ विद्यार्थी जि.प. शाळांत परतले आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या शर्यतीने पुढे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील १०६९ शाळा शंभर टक्के प्रगत करण्याचा माणस बांधला आहे.२५ मुद्यांच्या निकषांवर खरे उतरण्याचा चंग बांधण्यात आला आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून अप्रगत शाळांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.या उपक्रमाला कृतीत उतरवून प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत आहे. शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला.जिल्हा परिषदेच्या शाळांतील १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मूलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण घेणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीसी करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम केले जात आहेत.एकंदरित सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला. याचाच परिणाम खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३९५ झाली आहे. यात गोरेगाव तालुक्यात ५४, सालेकसा ४४, अर्जुनी-मोरगाव १४, सडक-अर्जुनी १५, गोंदिया १२६, तिरोडा ६२, देवरी ३३ व आमगाव ४७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष लक्ष दिल्यास आणखी संख्या वाढेल.शिक्षण विभागात अनेक चळवळीराज्यात डिजिटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, प्रगत शाळा, स्पोकन इंग्लिश, शाळा सिद्धी, समाज सहभाग, वाचन प्रेरणा दिवस यासारख्या चळवळी सुरु आहेत. यातून साध्य होणाºया परिणामांचा लाभ या मुलांनाही व्हायला हवे यादृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्टÑ विद्या प्राधिकरण, पुणे यांचेकडून भाषा व गणित या विषयातील संकल्पना समृद्धीकरण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरातून प्रत्येक मूल निर्धारित संपादणूक पातळी गाठू शकेल याचे नियोजन करण्यात आले आहे.अवांतर वाचनासाठी प्रयोगविद्यार्थ्यांना अवांतर वाचनात आवड निर्माण यासाठी वाचन कुटीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचनकुटी तयार करणाऱ्या शाळांची संख्या पाहता गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. लोकसहभागातून ह्या वाचन कुटी तयार करण्यात आया आहेत. जिल्ह्यातील १०४८ पैकी ५८७ शाळांमध्ये वाचन कुटी तयार करण्यात आल्या आहेत. ‘वाचन कुटी’त विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र, विविध मासिक, पाक्षीक, साप्ताहिक, जिल्ह्यातील भौगोलिक माहिती व्यतिरिक्त विविध पुस्तकें त्यात ठेवल्या जात आहेत.पटसंख्या वाढविण्यासाठी असाही प्रयोगप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल झाली. या शाळांतील उपस्थिती वाढविण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने योग्य पाऊल उचलत नामवंत कॉन्व्हेंट मध्ये आपल्या मुलांना शिकविण्यास पाठविणाऱ्या शिक्षकांना कारवाईस सामोरे जावे लागणार असा इशारा दिल्याने काही शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जि.प. शाळेत टाकल्याची माहिती आहे. जि.प. शाळांतील शिक्षक आपल्या मुलांना खासगी नामवंत शाळेत शिकविण्यासाठी पाठवित असल्यामुळे ते जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे जि.प. शाळांतील शिक्षकांनी आपापल्या मुलांना जि.प. शाळेतच शिकवावे अशी सक्ती करण्यात आली आहे.