शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

मनरेगाचे ३५ कोटी रुपये दोन वर्षांपासून अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी फक्त गोंदिया जिल्ह्यातील मनरेगाचा निधी देण्यात आला नाही. कुशल (मरेटियल) चे पैसे मागील दोन वर्षापासून अडून आहेत.सन २०१८-१९ या वर्षातील २२ कोटी ८० लाख ७६ हजार व सन २०१९-२० या वर्षातील १२ कोटी ५४ लाख ९ हजार रुपये प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देसरपंच संघटनेचा पवित्रा : प्रशासनाचे वेळ काढू धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत मनरेगा अंतर्गत जी कामे करण्यात आली. त्या कुशल कामाचे ३५ कोटी रुपयापेक्षा अधिकची देयके थकले आहेत. महाराष्ट्रातील एकमेव गोंदिया जिल्ह्यावरच महाराष्ट्र शासन अन्याय करीत आहे.त्यामुळे आचारसंहिता लागण्यापुर्वी मनरेगाचे पैसे न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायत युनियन आमगावने घेतला आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी फक्त गोंदिया जिल्ह्यातील मनरेगाचा निधी देण्यात आला नाही. कुशल (मरेटियल) चे पैसे मागील दोन वर्षापासून अडून आहेत.सन २०१८-१९ या वर्षातील २२ कोटी ८० लाख ७६ हजार व सन २०१९-२० या वर्षातील १२ कोटी ५४ लाख ९ हजार रुपये प्रलंबित आहेत.आमगाव, सालेकसा व देवरी या तीन तालुक्यातील मनरेगा अंतर्गत जी कामे करण्यात आली.त्या कामांची पाहणी स्वत: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केली. गोरठा आणि ठाणा येथे स्वत: दयानिधी यांनी टेप लावून रस्त्यांची मोजणी केली. या कामासंदर्भात समाधान व्यक्त करीत आठ दिवसात या कामाचे पेमेंट करुन देण्याची हमी देण्यात आली. १९ जून २०१९ रोजी आठ दिवसात पैसे देण्याची हमी देणाऱ्या मुकाअने दीड महिन्याचा कालावधी लोटूनही कवडी ही दिली नाही. नुकतेच पालकमंत्री डॉ. परिणय फुके जिल्ह्याच्या दौºयावर आले असताना त्यांना आमगाव तालुक्यातील कंत्राटदारांनी या संदर्भात माहिती दिल्यावर मनरेगाचे आयुक्त व मुख्य सचिव एकनाथ डवरे यांच्याशी दुरध्वनीवरुन फुके यांनी चर्चा केली.गोंदिया जिल्ह्यावर हा अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटल्यावर त्यांनी दोन दिवसात पेमेंट करुन देतो असे फुके यांना सांगितले.परंतु या बाबीला महिना उलटूनही कुशल-अकुशल कामाचे पैसे देण्यात आले नाही. ग्रामपंचायतीला ई-निविदेद्वारे साहित्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी उसनवारीवर व कर्ज घेऊन साहित्य उपलब्ध करुन दिले.शासनाच्या विकास कामात हातभार लावणाऱ्या कंत्राटदारांनी दोन पैसे कमविण्याच्या नादात कर्ज काढून साहित्य उपलब्ध करुन दिले. परंतु त्यांना मागील दोन वर्षापासून पैसे न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. परिणामी त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.याकडे मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया व अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हाधिकारी गोंदिया यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप होत आहे.

 

टॅग्स :sarpanchसरपंच