शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ३५ बसफेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:31 AM

नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (पीएलजीए) सप्ताहाला रविवार २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सप्ताहादरम्यान नक्षलवादी कारवायांत वाढ होत असते. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केले आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा सर्तकतेचा इशारा : पीएलजीए सप्ताह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (पीएलजीए) सप्ताहाला रविवार २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सप्ताहादरम्यान नक्षलवादी कारवायांत वाढ होत असते. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केले आहे. तर गोंदिया आगाराने नक्षलप्रभावित भागातील ३५ बसफेºया रद्द केल्या आहेत.दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षलवादी पीएलजीए सप्ताह पाळतात. सप्ताहाच्या कालावधी नक्षलप्रभावित भागात नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होत असते. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील सात आठ वर्षांत पोलीस विभागाच्या योग्य नियोजनामुळे एकही मोठी घटना घडली नाही. जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे ६ दलम कार्यरत असल्याची माहिती पोलिस विभागाच्या सूत्रांनी दिली. यामध्ये देवरी, सालेकसा, तांडा, कोरची व कुरखेडा दलमचा समावेश आहे. नक्षलवादी गोंदिया जिल्ह्यातील जंगलांचा उपयोग रेस्ट झोन म्हणून करीत असल्याचे बोलल्या जाते.लगतच्या गडचिरोली व छत्तीसगडच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया फार कमी आहेत.जिल्ह्यातील सालेकसा, दरेकसा, तसेच देवरी तालुक्यातील ककोडी, चिचगड या परिसरात अधून मधून नक्षलवादी कारवाया होत असतात. मात्र पीएलजीए सप्ताहा दरम्यान या भागातील नागरिकांमध्ये थोड्याफार प्रमाणात भीतीचे वातावरण असते.या दरम्यान काळी-पिवळी व आॅटोची वाहतूक पूर्णपणे बंद असते. याचा परिणाम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर सुध्दा होतो. सप्ताह दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून गोंदिया आगाराने सालेकसा तालुक्यातील मानव विकास योजनेच्या सात बसेस बंद केल्या आहेत. तर गोंदिया-डोंगरगड ही बससेवा केवळ सालेकसापर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. तर मलाजखंडची बस देखील मधातूनच परत गोंदियाला येणार आहे. चांदसूरज, बंजारी, खोलगड, बिजेपार या गावातील प्रवाशांना सप्ताहा दरम्यान बससेवेपासून वंचित राहावे लागणार आहे. गोंदिया आगार व्यवस्थापक पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलप्रभावित भागातील बसेस रात्रीच्या वेळेस पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात येणार आहे. या सप्ताहामुळे ३५ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगितले. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलप्रभावित भागातील पोलिसांना व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना सुध्दा सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.पोलीस यंत्रणा सज्जगोंदिया: सीपीआय माओवादी संघटनेच्या नक्षलवाद्यांकडून २ ते ८ डिसेंबर दरम्यान पीएलजीएस सप्ताह स्थापना दिवस म्हणून नक्षलवादी साजरा करतात. या सप्ताहात नक्षलवाद्यांकडून घातपातचे कृत्य होऊ नये,यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.या सप्ताहात नक्षलवादी घातपाताचे कृत्य करतात, महत्वाच्या व्यक्तीचे अपहरण, खून , जाळपोळ यासारखे गंभीर गुन्हे करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतात. सदर कालावधीत नक्षलवादी आक्रमक भूमिका घेऊन अटक असलेल्या नक्षलवाद्यांना पळवून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही.पीएलजीए सप्ताहाच्या काळात नक्षलवाद्यांकडून घडवून आणल्या जाणाºया हिंसक कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ ते १० डिसेंबरपर्यंत पोलिसांचा नक्षलग्रस्त भागात चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.नक्षलवाद्यांचे कुटील डाव वेळीच हाणून पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.नक्षलप्रभावीत भागातील पोलीस स्टेशन, दूरक्षेत्रातील पोलीस चौकीत कार्यरत जवांनाना सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलीसांच्या पेट्रोलिंगमध्ये वाढ केली आहे. नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस विभागाची बारीक नजर आहे.हरिष बैजल, जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया

टॅग्स :naxaliteनक्षलवादी