शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

३४३ उमेदवार उरले रिंगणात

By admin | Updated: October 21, 2015 01:57 IST

येत्या १ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१९) नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम...

गोंदिया : येत्या १ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१९) नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनी ५९ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगर पंचायतींच्या ६८ जागांसाठी होत असलेल्या प्रथम निवडणुकीत आता ३४३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर या उमेदवारांना मंगळवारी (दि.२०) निवडणूक चिन्हांचे वाटपही करण्यात आले. जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव, देवरी, गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या पाच तालुकास्थळांच्या ग्राम पंचायतींचा दर्जा वाढवून त्यांना नगर पंचायतींचा दर्जा देण्यात आला आहे. नव्याने स्थापना करण्यात आलेल्या या नगर पंचायतींमधील सालेकसा व आमगाव नगर पंचायतींच्या निवडणुकांवर स्थगिती आल्याने फक्त उर्वरीत चार नगर पंचायतींच्या निवडणुका होत असून येत्या १ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रीया घेतली जाणार आहे. या नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सोमवारी (दि.१९) नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी ५९ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले असून आता ६८ जागांसाठी ३४३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यात गोरेगाव नगर पंचायतमध्ये आलेल्या ९९ नामांकन अर्जांमधील २३ नामांकन अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे येथे आता ७६ उमेदवार रिंगणात उरले आहेत. सडक-अर्जुनी नगर पंचायतमध्ये १९ उमेदवनारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले असल्याने येथे आता १०४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतमध्ये ९० नामांकन अर्जांमधील आठ अर्ज मागे घेण्यात आले असून येथे आता ८२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर देवरी नगर पंचायतमध्ये १९ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने येथे आता १०४ उमेदवार रिंगणात उरले असून आपले भाग्य आजमावित आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी (दि.२०) रिंगणात उरलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याने निवडणुकीला रंग चढला आहे. (शहर प्रतिनिधी)