बाराभाटी : कुंभीटोला येथे रविवार (दि.३) आदिवासी हलबा-हलबी समाजाचा हा अनोखा उपक्रम सर्व विदर्भातील आदिवासी बांधव एकत्र येवून दरवर्षीप्रमाणे ३३ जोडपे विवाहबध्द झाले. उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते श्रावण राणा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून माजी आ. रामरतन राऊत, रत्नदीप दहिवले, तानेश ताराम, प्रकाश गहाणे, उमाकांत ढेंगे, सरपंच देवेंद्र राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना शाखा कुंभीटोला-बाराभाटीच्या सहकार्याने ३३ जोडपे विवाहबध्द झाले. दरवर्षीप्रमाणे सोहळा पार पडला. या वेळी कुंभीटोला, बाराभाटी, बोळदे, सुकळी, खैरी, दाभना, नवनीतपूर, महागाव, झरपडा, बोळदे-करड, पारडी, बाक्टी, नवेगाव, कानोली, कोहलगाव, रामपुरी, झासीनगर, मुंगली, खोबा, चिखली, राका, कवढा, डोंगरगाव, भरनोली, चान्ना, खोडका, रांजीटोला, जांभळी, पळसगाव इत्यादी गावांमधून आदिवासी समाजातील वर-वधू विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. सदर सोहळ्यासाठी शाखा अध्यक्ष तानेश ताराम, सचिव तुलाराम मारगाये, नरहरी किरसान, वासुदेव औरासे, आबाजी किरसान, शामलाल चर्जे, रामू औरासे आदींनी सहकार्य केले. यात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
३३ जोडपे विवाहबध्द
By admin | Updated: May 6, 2015 00:59 IST