शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 314 बाधितांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यातच बघता-बघता १५०० वर बाधितांची संख्या पोहचून गेली होती. शिवाय ३०० हून अधिक बाधितांची वाढ होत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली असून कोरोनावर मात करणारे जास्त निघत असल्याने ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही आता उतरली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच मात करणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येताना दिसत आहे. शनिवारी बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट होती. तर रविवारीही (दि.३०) जिल्ह्यात १६९ नवीन बाधितांची भर पडली असतानाच तब्बल ३१४ बाधितांनी कोरोनाला मात दिली आहे. मात्र एका मृताची नोंद घेण्यात आल्याने मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यातच बघता-बघता १५०० वर बाधितांची संख्या पोहचून गेली होती. शिवाय ३०० हून अधिक बाधितांची वाढ होत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली असून कोरोनावर मात करणारे जास्त निघत असल्याने ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही आता उतरली आहे. रविवारी (दि.३०) जिल्ह्यात जेथे १६९ बाधितांनी भर पडली आहे तेथेच ३१४ बाधितांनी कोरोनाला मात दिली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. यानंतर आता ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १३१० झाली आहे. विशेष म्हणजे, हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुक्यातील बाधितांची संख्या आता ४०० एवढी झाली असून यामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या घटत असल्याचे दिसत आहे.

 आणखी एका बाधिताचा मृत्यू - एकीकडे जेथे रुग्ण संख्या वाढत आहे, तेेथेच दुसरीकडे मृतांची संख्यासुद्धा वाढत असल्याने ही बाब टेन्शन वाढविणारी ठरत आहे. दुसऱ्या लाटेत जून महिन्यापर्यंत मृतांची नोंद घेण्यात आली होती. मात्र आता नवीन वर्षांतच ४ बाधितांच्या मृत्यूची नोंद असून यात रविवारी एका मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे मृतांचा आकडा आता ५८४ झाला आहे. 

नियमांचे पालन अत्यावश्यक - सध्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच तेवढ्याच गतीने रुग्ण बरे होताना दिसत आहे. ॲक्टिव्ह रुग्णांपैकी मोजकेच रुग्ण भरती होत असून त्यांनाही गंभीर लक्षणे नाहीत. नेमकी हीच बाब हेरून जिल्हावासी तिसऱ्या लाटेला अगदी हलक्यात घेताना दिसत आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या