शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ३१ लाख पुस्तकांचे वाचन

By admin | Updated: September 10, 2016 00:13 IST

जिल्ह्यात दप्तर विरहीतदिन वाचन आनंद दिन म्हणून जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये साक्षरतादिनी साजरा करण्यात आला.

नरेश रहिले  गोंदियाजिल्ह्यात दप्तर विरहीतदिन वाचन आनंद दिन म्हणून जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये साक्षरतादिनी साजरा करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील २ लाख १६ हजार ३७० विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी ३१ लाख ६० हजार ३७३ पुस्तकाचे वाचन केले. गोंदियाच्या शिक्षण विभागाने केलेल्या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी युनिसेफच्या सदस्या विद्या कुळकर्णी यांनी गोंदिया गाठून त्यांनी शाळांना भेटी दिल्यात. गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात वाचन आनंद दिवसाला उदंड प्रतिसाद मिळाला. अवांतर वाचनाची प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी १० पुस्तके हाताळली. वर्ग १ ते १२ वी पर्यंतच्या जिल्ह्यातील १६८४ शाळांतील २ लाख १६ हजार ३७० विद्यार्थ्यांनी ३१ लाख ६० हजारापेक्षा अधिक पुस्तकाचे वाचन केले.आमगाव तालुक्यातील २१ हजार ८५ विद्यार्थ्यांनी ३ लाख १६ हजार २७५ पुस्तकाचे वाचन केले, सडक-अर्जुनी तालुक्यातील १८ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी २ लाख ६३ हजार ६६२ पुस्तकाचे वाचन केले, तिरोडा तालुक्यातील २८ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी ४ लाख ३१ हजार ९२५ पुस्तकाचे वाचन केले, देवरी तालुक्यातील १८ हजार २०२ विद्यार्थ्यांनी २ लाख ३६ हजार ६२६ पुस्तकाचे वाचन केले, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी ४ लाख १९ हजार १७४ पुस्तकाचे वाचन केले, सालेकसा तालुक्यातील १३ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी २ लाख ७ हजार ४६५ पुस्तकाचे वाचन केले, गोरेगाव तालुक्यातील २१ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी ३ लाख २१ हजार ९१ पुस्तकाचे वाचन केले. गोंदिया तालुक्यातील ६४ हजार २७७ विद्यार्थ्यांनी ९ लाख ६४ हजार १५५ पुस्तकाचे वाचन केले.