शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

३०० कि.मी.कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:24 IST

सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही.

ठळक मुद्दे४० किमी. मुख्य कालव्याचाही समावेश : आमदार अग्रवाल यांनी केली कामाची पाहणी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी सोडले जात असले तरी कालव्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. ही बाब हेरून आमदार अग्रवाल यांनी जलसंपदा सचिवांसोबत बैठक घेऊन कालव्यांच्या दुरूस्तीचे निर्देश दिले होते. परिणामी बाघ प्रकल्पांतंर्गत येत असलेल्या ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांच्या दुरूस्ती व खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, यात ४० कि.मी. लांबीच्या मुख्य कालव्याचा समावेश आहे.बाघ प्रकल्प जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असून सालेकसा तालुक्यात चार हजार, आमगाव तालुक्यात सात हजार व गोंदिया तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर अशाप्रकारे एकूण २३ हजार ५०० हेक्टर शेतीला यातून सिंचन केले जाते. मात्र प्रकल्पातील मुख्य व लघू कालव्यांची स्थिती खराब असल्यामुळे आमगाव व सालेकसा तालुक्यातच पाणी वाहून जाते. गोंदिया तालुक्यातील टोकावर असलेल्या शेतीला पाणी पोहचत नाही. परिणामी काटी, बिरसोला, देवरी, सोनबिहरी, छिपीया, पांजरा, गिरोला आदि भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होते.ही बाब लक्षात घेत आमदार अग्रवाल यांनी, मुंबई येथे जलसंपदा सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागातील अन्य अधिकाºयांची बैठक घेतली. यात त्यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली दिसत असले तरिही केवळ १५००-२००० हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे सांगीतले. तसेच शेतकºयांचे होत असलेले नुकसान लक्षात घेत तालुक्यातील संपूर्ण ३०० कि.मी. कालव्यांचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यास सांगीतले. विशेष म्हणजे, यंदा पावसाअभावी रब्बीचा हंगाम नसल्यामुळे हीच संधी साधून लवकरात लवकर काम करण्यास सांगीतले.यावर सचिव चहल यांनी अभियांत्रीकी विभागातील अधिकाºयाना गोंदिया तालुक्यातील ३०० कि.मी. लांबीचे कालवे तसेच सालेकसा, आमगाव तालुका होत गोंदिया तालुक्यात येत असलेल्या सुमारे ४० कि. मी. लांबीच्या मुख्य कालव्याची दुरूस्ती व खोलीकरण करण्याचे निर्देश दिले.यासाठी लागेल तेवढ्या यंत्रणेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यास सांगीतले. त्यानुसार कालव्यांच्या सफाई व दुरूस्तीचे पहिल्या टप्प्यातील काम पांढराबोडी-दासगाव दरम्यान सुरू आहे. येथे आमदार अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना या कामबाबत माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घ्याजलसंपदा सचिव चहल व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी काही काळापूर्वीच कालव्यांच्या सफाईचे काम करण्यात आल्याचे सांगीतले. यावर मात्र आमदार अग्रवाल यांनी आक्षेप घेत किती कि.मी. कालव्यांची सफाई झाल्याचे विचारले असता त्यांच्या या प्रश्नावर अधिकाºयांकडे उत्तर नव्हते. त्यांनी ३०० कि.मी. लांबीच्या कालव्यांत ५-१० कि.मी. कालव्यांच्यी सफाई योग्य बाब नसल्याचे ठणकावून सांगीतले. पाण्या अभावी शेतकरी कंगाल होत असताना शासन फक्त मदतीच्या घोषणा करीत आहे. मात्र हे पुरेसे नसून शासनाने अधिकाºयांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचे निर्देश देण्याची गरज असल्याचे अग्रवाल म्हणाले.