शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
3
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
4
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
5
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
6
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
7
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
8
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
9
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
10
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
11
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
12
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
13
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
14
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
15
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
16
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
17
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
19
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
20
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

३० हजार ५३५ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 1, 2017 00:16 IST

इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जाती यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु मागील पाच वर्षापूर्वीची

१३ कोटींची मागणी : २१८६ विद्यार्थ्यांची पायपीट कायम गोंदिया : इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जाती यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु मागील पाच वर्षापूर्वीची शिष्यवृत्ती २१८६ विद्यार्थ्यांना न मिळाल्याने शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच आहे. जुने व नवीन वर्षाचे ३० हजार ५३५ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सन २०१६-१७ या वर्षाकरीता शिष्यवृत्तीसाठी ३४ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहे. त्या विद्यार्थ्यांपैकी २० हजार ३६४ विद्यार्थ्यांच्या अर्जाची मूळ प्रत समाजकल्याण कार्यालयाला प्राप्त झाली. परंतु १४ हजार १२९ विद्यार्थ्यांच्या अर्जाची मूळ प्रत अजूनपर्यंत पोहोचली नाही. समाजकल्याण विभागाने यापैकी १५ हजार ३२ अर्ज शिष्यवृत्तीसाठी मंजूर केले असून त्यातील ३ हजार ७८७ अर्जाचे बिलही टाकले आहे. मात्र निधीअभावी ११ हजार २४५ प्रकरणे तसेच पडून आहेत. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी २६ कोटी ८६ हजारांची मागणी असताना शासनाने आतापर्यंत १३ कोटी २७ लाख पाठवले आहे. या आलेल्या पैशापैकी १३ कोटी १५ लाखांची शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागाने १८ हजार १७३ विद्यार्थ्याना दिली. आता नविन व जुने असे मिळून ३० हजार ५३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची आहे. (तालुका प्रतिनिधी) २१८६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वांद्यात एक वर्ष लोटल्यावर दुसऱ्या वर्षात मागच्या वर्षातील पैशाची देवाण-घेवाण असल्यास कोषाधिकारी अधिनियम १५१(१) अंतर्गत शासनाकडून अन्वेषण प्रमाणपत्र घ्यायचे असते. परंतु अन्वेषण प्रमाणपत्र न मिळाल्याने सन २०११-१२ ते २०१४-१५ या वर्षातील एकूण २१८६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. १५५४ विद्यार्थ्यांची २ कोटी २ लाख देण्यासाठी २७ सप्टेंबर २०१६ ला, ३९० विद्यार्थ्यांचा १ कोटी १४ लाखाचा प्रस्ताव २९ नोव्हेंबर २०१६ ला, २४२ विद्यार्थ्यांचा ९७ लाखांचा प्रस्ताव १५ फेब्रुवारी २०१७ रोजी पाठविण्यात आला आहे. वर्षभरात २६ कोटींची गरज वर्षभरात २६ कोटी रुपये शिष्यवृत्तीसाठी लागतात. त्यापैकी १३ कोटी ६९ लाख ७४ हजार रुपये मिळाले आहे. त्यापैकी १३ कोटी ७ लाख ८५ हजार वाटप करण्यात आले. सद्यस्थितीत ६७ लाख ८९ हजार समाजकल्याण विभागाकडे शिल्लक आहेत. १३ कोटी ९६ लाख ५१ हजार रुपयांची मागणी आहे.