शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

3 हजार कर्मचारी व वर्कर्स शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 05:00 IST

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा लढण्यासाठी कुणाकडेही काहीच शस्त्र नव्हते. अशात कोरोनाने कित्येकांचा जीव घेतला. दुसरी लाट आली तेव्हा लस आली होती; मात्र व्यापक प्रमाणात लसीकरण न झाल्याची संधी साधून कोरोनाने डाव साधून घेतला व पहिल्या लाटेपेक्षा जास्त जीवितहानी केली; मात्र त्यानंतर कोरोनाला आपले पाय पसरू द्यायचे नाही हे ठरवून देशात लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  मागील २ वर्षांपासून जगाला लागलेले कोरोनाचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. दोन लाटांनी कहर केल्यानंतर तिसरी लाट आताही आपला कहर करीत आहे. अशात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोना लसींचा बूस्टर डोस लावण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार जिल्ह्यात १०५५८ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला डोस देण्याचे उद्दिष्ट होते; मात्र यातील ३०९० कर्मचारी व वर्कर्सने अद्याप बूस्टर डोस घेतला नसल्याचे दिसत आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा लढण्यासाठी कुणाकडेही काहीच शस्त्र नव्हते. अशात कोरोनाने कित्येकांचा जीव घेतला. दुसरी लाट आली तेव्हा लस आली होती; मात्र व्यापक प्रमाणात लसीकरण न झाल्याची संधी साधून कोरोनाने डाव साधून घेतला व पहिल्या लाटेपेक्षा जास्त जीवितहानी केली; मात्र त्यानंतर कोरोनाला आपले पाय पसरू द्यायचे नाही हे ठरवून देशात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत आता १५ वर्षांपेक्षा पुढे सर्वांचे लसीकरण केले जात असून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरणाचे फलित असे की, तिसरी लाट आली; मात्र लसीचे कवच असल्याने ती सर्दी, खोकला व तापावरच मर्यादित राहिली आहे; मात्र सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सच्या बाबतीत धोका पत्करणे योग्य नसल्याने शासनाने बूस्टर डोस देण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात १०५५८ कर्मचारी व वर्कर्सच्या बूस्टर डोसचे उद्दिष्ट होते; मात्र गुरुवारपर्यंत (दि.१०) यातील ७४६८ कर्मचारी व वर्कर्सला बूस्टर डोस देण्यात आला आहे. तर ३०९० कर्मचारी व वर्कर्स अद्याप उरले आहेत. 

 गोंदिया तालुका पिछाडीवर - गोंदिया तालुका कोरोनाचा सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट राहिला आहे. मात्र असे असतानाच तालुकावासीच सर्वात जास्त लापरवाहीने वागताना दिसत आहेत. यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स दिसून येत आहेत. कारण, तालुक्यात ५७८३ कर्मचारी टार्गेट असूनही ३८८१ जणांनीच बुस्टर डोस घेतला आहे. म्हणजेच, १९०२ जणांनी डोस टोलवला आहे. येथेच आमगाव तालुका आघाडीवर असून ६९९ कर्मचारी व वर्कर्समधील ६९८ जणांनी डोस घेतला असून फक्त १ जण उरला आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस