शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

नोकराने केली ३ लाख ३२ हजारांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:40 PM

शहरातील अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्समध्ये २७ दिवसांपासून काम करणाऱ्या नोकराने मालकाला ३ लाख ३२ हजार रुपयांनी गंडविले.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिष्णा उमेशप्रसाद सोनी रा.बाबुराव इटनकर वॉर्ड गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर असे आरोपी नोकराचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्समध्ये २७ दिवसांपासून काम करणाऱ्या नोकराने मालकाला ३ लाख ३२ हजार रुपयांनी गंडविले.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिष्णा उमेशप्रसाद सोनी रा.बाबुराव इटनकर वॉर्ड गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर असे आरोपी नोकराचे नाव आहे.अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्सचे मालक पंकज धनराज चोपडा (४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहराच्या गांधी प्रतिमाजवळ अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्स मागील ५ वर्षापासून सुरु आहे. यात ११ कर्मचारी कामावर आहेत. क्रिष्णा शर्मा २७ दिवसांपासून तो कामावर होता आणि मालकाच्या घरी खालच्या खोलीमध्ये राहत होता.दुकानातील सोन्या-चांदीचे दागिणे दुरुस्तीकरिता राजू सामता, सोनार चाळ, प्रभूरोड गोंदिया यांच्याकडे दिवसातून अनेकदा नोकराच्या हातून पाठविले जात होते. १८ जुलै रोजी सदर दागिणे दुरुस्तीकरिता राजू सामता यांच्याकडे रात्री ८ वाजता पाठविले. मालकाची मोटरसायकल घेऊन गेलेला क्रिष्णा रात्री ९.३० पर्यंत परत आला नाही. मालकाने फोन लावल्यावर त्याने फोनही उचलला नाही.५७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मंगळसूत्र, किमत २ लाख १७ हजार, २४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगडया किमत ८६ हजार, ८ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, किमत २९ हजार असा ३ लाख ३२ हजाराचा माल त्याने पळवून नेला.यासंदर्भात १९ जुलै रोजी गोंदिया शहर पोलिसांत भादंविच्या कलम ४०८, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी